Sikkim Rain Agrowon
ताज्या बातम्या

Sikkim Rain Damage : सिक्कीमध्ये पावसाचा हाहाकार, विदेशी पर्यटकांसह २ हजारपेक्षा जास्त लोक अडकले

Heavy Rain Sikkim : भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दोन बसमधून आतापर्यंत एकूण ७२ पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.

Team Agrowon

Sikkim Rain News : सिक्कीममध्ये जोरदार पाऊस झाल्याने अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने अचानक आलेल्या पुरानंतर झालेल्या भूस्खलनामुळे उत्तर सिक्कीममध्ये २ हजारहून अधिक देशी-विदेशी पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी सिक्कीम सरकारकडून सुरक्षा जवान करून बचावकार्य सुरू आहे.

याबाबत तेथील जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बीआरओ प्रोजेक्ट स्वस्तिक नावाची एक संस्था आहे त्यांनी बाधित क्षेत्रामध्ये तात्पुरती क्रॉसिंग बांधण्यासाठी काम सुरू केले आहे. याचबरोबर पीआरओ महेंद्र रावत म्हणाले की, आज (ता. १७) दुपारी 12 वाजेपर्यंत ३०० पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. युद्धपातळीवर रस्ता पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून अनेक पर्यटकांचे स्थलांतर सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

सिक्कीम पोलिसांच्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दोन बसमधून आतापर्यंत एकूण ७२ पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान गंगटोकच्या १९ पुरुष, १५ महिला आणि ४ मुले असलेली पहिली बस मंगन जिल्ह्यातील पेगोंग येथे अडकली होती. अशा अनेक वाहनांतून हजारो लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील नद्यांना अचानक पूर आला. या पुरामुळे उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंग या भागांचा राज्याच्या इतर भागांपासून संपर्क तुटला आहे. या पुरामुळे महामार्ग तसेच पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक करणे असुरक्षित झाले आहे. लाचेन आणि लाचुंग भागातील हॉटेलमध्ये १ हजार ९७५ देशी आणि ३६ विदेशी पर्यटक अडकल्याची माहिती आहे.

यातील परदेशी पर्यटकांमध्ये २३ बांगलादेशचे, १० अमेरिकेचे आणि तीन सिंगापूरचे आहेत. यासोबतच उत्तर सिक्कीममध्ये विविध ठिकाणी ३४५ कार आणि ११ मोटारसायकली अडकल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाऊस थांबल्यानंतर रस्ते स्वच्छतेचे काम सुरू करून पर्यटकांना सुरक्षीत स्थळी बाहेर काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे लाचेन परिसरात अडकलेल्या पर्यटकांमध्ये ६० महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिक्कीम पोलीस, GREF, BRO, ITBP, आर्मी, ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन सिक्कीमचे क्विक अॅक्शन टीम एकत्र काम करत आहेत. उत्तर सिक्कीम जिल्हा प्रशासनाने अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक - 8509822997 /116464265 सेट केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT