Monsoon Rain Alert  agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Rain Alert : मान्सून पुन्हा सक्रीय? बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Maharashtra Rain : राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज (ता.०२) आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.

sandeep Shirguppe

Weather Forecast Maharashtra : राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज (ता.०२) आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार गडचिरोली, गोंदिया, भंडरा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कालपासून पुणे आणि मुंबईत पाऊस सुरु झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरूवात केली. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यासह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसल्या. आज शनिवारी पहाटेपासूनच पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

महिनाभराच्या कालावधीनंतर आज पुन्हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसगरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी ४८ तास पावसाचा जोर राहणार आहे.

काल रात्रीपासून पुणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. पुणेकरांची पहाट उजाडली ती पावसानेच, पहाटे सहाला सुरू झालेला पाऊस सकाळी ११.३० पर्यंत सुरूच होता. पुणे शहरातील बिबवेवाडी, कोथरुड, पेठ परिसर, एनआयबीएम, शिवाजीनगर, हडपसर या भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पिंपरी चिंचवडमधील मोशी आणि मावळ तालुक्यातही मुसळधार पावसाची नोंद आहे.

कोकणातील काही भागात पाऊस

मागील १५ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे रत्नागिरीमध्ये जोरदार आगमन झाले. पावसाअभावी भात शेती संकटात सापडली होती. तर नाचणीसह अन्य पिकांना धोका निर्माण झाला होता. पुढचे दोन दिवस असाच पाऊस असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT