Millets In Diet Agrowon
ताज्या बातम्या

Millet IN Diet : आहारात पौष्टिक तृणधान्य गरजेचे

गेल्या काही वर्षांपासून लोकांचा दैनंदिन आहार घेताना काही प्रमाणात बदल झाला आहे. त्याचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत.

Team Agrowon

दौंड : ‘‘गेल्या काही वर्षांपासून लोकांचा दैनंदिन आहार (Daily Diet) घेताना काही प्रमाणात बदल झाला आहे. त्याचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. हे परिणाम टाळण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा (Millet In Diet) जास्तीत जास्त समावेश करावा,’’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले.

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वतीने दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२२-२३’ निमित्त ‘पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्त्व या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

सरपंच छाया झगडे, उपसरपंच आरती झगडे, ग्रामपंचायत सदस्य सलमा सय्यद, संदीप जगताप, छगन झगडे, गणेश शिंदे, रेखा निंबाळकर, संध्या शितोळे, कृषी सहायक शंकर कांबळे, प्रकाश लोणकर आदी उपस्थित होते.

माने म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२२-२३ हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त संपूर्ण जगभरात पौष्टिक तृणधान्याविषयी जनजागृती सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे बाजरी तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी चर्चा करण्यात आली.’’

दौंडचे आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी विविध तृणधान्यांची ओळख करून दिली. जिल्हा संसाधन व्यक्ती दिलावर शेख यांनी शेतकरी व महिला भगिनी यांना विविध तृणधान्यापासून खाद्यपदार्थ निर्मिती व त्याचे मार्केटिंग व ब्रॅण्डिंग याबाबत मार्गदर्शन केले.

कृषी सहायक अझरुद्दीन सय्यद यांनी बाजरीचे आहारातील महत्त्व समजून सांगितले. कृषी पर्यवेक्षक अतुल होले यांनी सूत्रसंचालन केले. अंगद शिंदे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting Today : संत्रा निर्यातीसाठी ५० टक्के अनुदान योजना बंद; मंत्रिमंडळ बैठकीत १४ निर्णय

Rain Update: उन्हाचा चटका वाढला; मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

Mango Management: हिमायतबागेत राष्ट्रीय स्तरावरील आंबा बाग व्यवस्थापन प्रशिक्षण

Khandesh Cotton Cultivation: खानदेशात कापूस लागवडीची तयारी

Washim Water Shortage: वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ७४ लाख मंजूर

SCROLL FOR NEXT