Milk Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Milk Rate : दूध उत्पादकांना लिटरमागे ३ रुपयांचा फटका

Milk Price : शासनाने ३४ रुपये दर निश्‍चित केल्याचे एकीकडे स्वागत असले, तरी बुलडाणा जिल्ह्यात मात्र दुग्ध व्यावसायिकांना सरासरी ३ रुपयांचा फटका बसतो आहे.

Team Agrowon

1. अमरावती जिल्हात खतांचा तुटवडा

पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांकडून खतांची मागणी वाढली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात खतांची टंचाई असल्याची ओरड सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाकडून खतांचा साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमरावती जिल्हा कृषी कार्यालयाकडून संरक्षित साठ्यातील युरिया व डीएपीचा १ हजार ०१७ टन साठा मुक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरीप हंगामासाठी १ लाख ६० हजार टन खतांची मागणी नोंदविली होती. पण १ लाख १४ हजार ३१० टन खत देण्याचे मंजूर करण्यात आले.

2. पीकविमा योजनेला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद

नागपूर जिल्ह्यात पीकविमा योजनेला रेकाॅर्डब्रेक प्रतिसाद मिळाला. एक रुपया हप्ता भरून पीक विमा यंदा देण्यात आला. पण सुरुवातील शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद योजनेला मिळत नव्हता. कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेत योजनेच्या शेवटच्या आठवड्यात जागृतीवर भर दिला. त्यामुळे गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत ४७८ टक्‍के शेतकऱ्यांचा सहभाग योजनेत झाला. १५ लाख १४ हजार ४८३ खातेदारांपैकी सुमारे १४ लाख २५ हजारांवर शेतकऱ्यांनी विमा घेतला. ही मोठी उपलब्धी मानली जाते. 

3. प्रकल्पांत ६८ टक्के जलसाठा

जुलै महिन्यात झालेल्या पावसाने तूट भरून काढण्यासोबतच जलसाठाही वाढवला. अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ६८ टक्के जलसाठा झाल्याने आगामी काळातील पाणीपुरवठा आणि सिंचनाची चिंता जवळपास मिटली. अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या धरणासह सात मध्यम व ४५ लघुप्रकल्प आहेत. अमरावती महानगरासह शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात जुलैमध्ये ७४ टक्के जलसाठा होणे अपेक्षित असते, तो या वेळी ७९ टक्के झाला. मध्यम प्रकल्पातही साठा समाधानकारक झाला. 

4. महावितरणची नवीन वीजजोडणी आता २४ तासांत

अकोला जिल्ह्यात नवीन वीज जोडणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जावर तातडीने कार्यवाही करीत २४ तासांत वीजजोडणी देण्यात येणार आहे. अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी पुढाकार घेत नवीन वीज जोडणीसाठी प्राप्त अर्जावर झटपट वीजजोडणी देण्यासाठी २४ ते ४८ तासांत वीजजोडणी मोहीम सुरू केली. या मोहिमेत शहरी भागात २४ तासांत, तर ग्रामीण भागात ४८ तासांत वीजजोडणी देण्यावर महावितरणचा भर राहणार आहे.

5. दूध उत्पादकांना कसा फटका बसतो आहे?

शासनाने ३४ रुपये दर निश्‍चित केल्याचे एकीकडे स्वागत असले, तरी बुलडाणा जिल्ह्यात मात्र दुग्ध व्यावसायिकांना सरासरी ३ रुपयांचा फटका बसतो आहे. जिल्ह्यात खासगी डेअरींकडून किमान दर ३६ ते ३७ रुपयांपर्यंत प्रतिलिटर मिळत होता. शासनाने घोषणा केल्यानंतर या खरेदीदारांनी ३४ रुपयांचा दर देणे सुरू केले. जिल्ह्यात दूध संघ डबघाईस आल्याने दुग्धोत्पादन करणाऱ्यांना खासगी डेअरींच्या खरेदीवर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या डेअरींकडून हजारो लिटर दुधाची खरेदी केली जाते. विविध डेअरींनी स्थानिक भागात संकलन केंद्रे उघडले असून, त्या माध्यमातून खरेदी सुरू आहे.

जिल्हा संघ डबघाईस आल्यापासून जिल्ह्यातील पशुपालकांना खासगी डेअरींचा आधार अधिक आहे. या डेअरींची वाहने तालुक्यांमध्ये फिरून संकलन करीत असतात. जिल्ह्यात सुमारे दीड लाख लिटरपर्यंत हे संकलन होत असल्याचे सांगितले जाते. डेअरींमध्ये खरेदीची स्पर्धा तयार झालेली आहे. त्यामुळे दुधाला किमान ३६ ते ३७ रुपयांपर्यंत दर मिळत होता. आता ३४ रुपये निश्‍चित केल्यानंतर तातडीने त्याची या डेअरींकडून अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे दूध उत्पादकांना लिटरमागे किमान ३ रुपयांचा फटका बसत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: सामूहिक अभयदान योजना

Farmer Struggles: महाग कृषी निविष्ठांमुळे केळी बागायतदार जेरीस

Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

Code of Conduct Violation Case: मोदींवर आचारसंहिता भंगप्रकरणी  कारवाईस आयोगाची टाळाटाळ

SCROLL FOR NEXT