milk purchase price hike Agrowon
ताज्या बातम्या

Milk Price Hike: चारा टंचाईमुळे दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ

Mumbai Milk Association : पावसाने ओढ दिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, मुंबई दूध उत्पादक संघाच्या बैठकीत दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. आज म्हणजेच, 1 सप्टेंबरपासून मुंबईत दरवाढ लागू करण्यात झाली आहे.

Swapnil Shinde

Buffalo Milk Price Hike: राज्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तसेच पाणी पातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे दुष्काळच्या छायेखाली असलेले दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अशात शनिवारी मुंबई दूध उत्पादक संघाची बैठक झाली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आजपासून म्हशीच्या दुधाचे घाऊक दर प्रतिलिटर २ रुपये वाढ करण्यात आले. 

राज्यात आॅगस्ट महिना कोरडा गेल्याने सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. अनेक भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.  त्यात चारा आणि पशुखाद्याच्या किमंतीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २५ आॅगस्ट) मध्ये मुंबई दूध उत्पादक संघाची बैठक झाली. या बैठकीत सुमारे, ७०० दूध डेअरी मालक उपस्थित होते. या बैठकीत म्हशीच्या दूध दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे दर शुक्रवारपासून म्हणजेच, १ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर मुंबईत म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरांत २ लिटरने वाढ झाल्याने किरकोळ दर ८५ रुपयांवरून ८७ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

काही दिवसांतच जन्माष्टमी आणि गणेशोत्सव हे सण साजरे होणार आहेत. या सणासुदीकाळात मिठाई आणि दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढतो. त्यापूर्वी म्हशीच्या दुधाच्या दरांत वाढ झाल्याने त्यामुळे मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT