Heat Wave  Agrowon
ताज्या बातम्या

Heat Wave : उष्णतेच्या लाटा येण्याचा हवामान विभागाचा इशारा

यंदा उन्हाळ्यात (मार्च ते मे) महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

पुणे : यंदा उन्हाळ्यात (मार्च ते मे) महाराष्ट्रात कमाल तापमानाचा (Maximum Temprature) पारा सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तर विदर्भ, मराठवाड्यात सरासरी इतके तर कोकणात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज आहे. यातच राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.  

यंदाच्या उन्हाळ्यातील (मार्च ते मे) तापमानाचा अंदाज मंगळवारी (ता. २८) जलविज्ञान आणि कृषी हवामानशास्त्र सेवेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. सी. भान यांनी जाहीर केला.

भान म्हणाले, की यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात देशाचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना पाचव्या क्रमांकावर आहे.

फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी १६.३१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. २०१६ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १६.८२ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमानाची नोंद झाली होती.

दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) वायव्य, पूर्व, मध्य आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे.

तर देशाच्या उर्वरित भागात मात्र कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. देशाच्या मध्य आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेचा लाटा येण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तसेच दक्षिण भारतातील राज्य वगळता उर्वरित देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरीसरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे.

ला-निना स्थिती निवळतेय
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ला - निना स्थिती आहे. ही ला - निना स्थिती कमकुवत होणार असून,

मॉन्सूनपूर्व हंगामात सर्वसाधारण एल-निनो स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल स्थिती (आयओडी) सध्या नकारात्मक असून, पूर्वमोसमी हंगामात ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.


मार्चमधील तापमान, पावसाचा अंदाज
हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार मार्च महिन्यात कोकण आणि पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी, तर पश्‍चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात सरासरी इतके कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे.

तर मार्च महिन्यात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण विदर्भात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.


उन्हाळा हंगामात उष्ण लाटा येणार असल्या, तरी मार्च महिन्यात देशात उष्णतेची लाट कमी राहण्याची शक्यता आहे.

ला-निना स्थिती निवळत असून, एप्रिल महिन्यापर्यंत प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाची स्थिती सर्वसामान्य होईल.

मॉन्सून काळातील एल-निनो स्थितीबाबत एप्रिलच्या मध्यावर बोलता येईल. त्याच वेळी मॉन्सूनच्या पावसावर बोलणे योग्य ठरेल.
- एस. सी. भान, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जलविज्ञान आणि कृषी हवामानशास्त्र सेवा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: सवलतीचा संशयकल्लोळ

Baramati Water Crisis: बारामतीचा जिरायत भाग तहानलेला

Digital Mapping: शेत-पाणंद रस्त्यांचे ‘डिजिटल मॅपिंग’

Farmers Support: आंदोलन सुरू असले तरी शेतकऱ्यांना सेवा सुरूच; आकृतिबंध रद्दसाठी लढा सुरू; कृषी सेवा महासंघाची माहिती

NCP Meeting 2026: दुष्काळी स्थितीवर राष्ट्रवादीची बैठक; मुंबईत २८ सप्टेंबरला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा

SCROLL FOR NEXT