Agriculture Drone | Agriculture Drone Pilot  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Drone : कृषी ड्रोन पायलटसाठी सामंजस्य करार

परभणी कृषी विद्यापीठात अधिकृत कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था स्थापनेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि गुरुग्राम (हरियाना) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्‍यात मंगळवारी (ता. २०) सामंजस्य करार करण्‍यात आला.

टीम ॲग्रोवन

परभणी : परभणी कृषी विद्यापीठात अधिकृत कृषी ड्रोन पायलट (Agriculture Drone Pilot) प्रशिक्षण संस्‍था स्थापनेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि गुरुग्राम (हरियाना) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्‍यात मंगळवारी (ता. २०) सामंजस्य करार करण्‍यात आला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेडचे संचालक अनुपकुमार उपाध्‍याय तसेच विद्यापीठामार्फत डॉ. उदय खोडके आणि डॉ. विशाल इंगळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रिक दीपाराणी देवतराज, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, ‘नाहेप’ प्रकल्‍प मुख्‍य संशोधक डॉ. गोपाल शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. दत्ता पाटील आदींची उपस्थिती होती.

कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापरासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या नियमानुसार अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून परवाना घ्यावा लागतो. त्यासाठीच्या या करारामुळे पीकनिहाय ड्रोन वापराच्‍या संशोधनास चालना मिळणार आहे.

ड्रोनद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी करणे, फवारणी करिता विविध प्रकाराचे नोझल तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्‍य गतीने आणि काटेकोरपणे फवारणी करणे या बाबत प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळणार आहे.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे अध्यक्ष असलेल्या राष्‍ट्रीय समितीने नुकतेच नऊ पिकांमध्ये ड्रोनचा सुरक्षित, कार्यक्षम वापराबाबतची मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागास सादर केले आहेत. मृदा आणि पीक अन्नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्‍याकरिता डॉ. इंद्र मणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्‍यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT