Worker Strike
Worker Strike Agrowon
ताज्या बातम्या

Mathadi Labor Strike : नाशिक जिल्ह्यात माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप

Team Agrowon

नाशिक : राज्य शासनाच्या कामगार, गृह, पणन, सहकार व इतर संबंधित खात्यांकडे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनकडून जिल्ह्यात बुधवारी (ता. १) लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली.

त्यानुसार जिल्ह्यांतील १७ बाजार समित्या (Market Committee) , विविध धान्य गोदाम (Warehouse) व मालधक्यांवर कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील शेकडो माथाडी कामगारांनी संपात (Mathadi Worker Strike) सहभाग घेतल्याने कामकाज ठप्प झाल्याची स्थिती होती.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्याद्वारका येथील संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तयारीसाठी झालेल्या बैठकीसाठी नारायण पोटे, रमेश पालवे, साहेबराव देवरे, संदीप साळे आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील सर्व बाजार समिती, मालधक्के, सरकारी धान्य गोदाम व विविध आस्थापनांमधील माथाडी कामगार लाक्षणिक बंदमध्ये सहभागी झाले असल्याचे जिल्हा सचिव सुनील यादव यांनी सांगितले.

कामगार विभागाच्या १२ ऑगस्ट २००८ रोजीच्या आदेशास नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने माथाडी, मापाडी कामगारांना सन २००८ पासून डिसेंबर २०२२अखेर १२६ कोटी लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांकडून येणे आहे.

कामगारांना लेव्हीच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांचे फायदे मिळत नाहीत याकरिता या प्रलंबित लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी, अशी मागणी नाशिक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

खासगी बाजार समित्यांमध्ये कामे मिळण्याची मागणी...

नाशिक जिल्हामध्ये श्री रामेश्वर कृषी मार्केट (उमराणे,ता. देवळा), मल्हारश्री खाजगी बाजार समिती(चंदनपुरी, ता. मालेगांव), मनकामनेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती (निफाड), शिवसिध्द गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती (अभोणा, कळवण) या खाजगी बाजार समित्या कार्यरत असून या ठिकाणी शासन निर्णयाप्रमाणे.

माथाडी आनुषंगिक कामे त्या त्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील बाजार समितीचे परवानेधारक व मंडळाच्या नोंदीत कामगारांना कामे मिळणे आवश्यक आहे.

परंतु कामाची मागणी करुणही अद्यापपर्यंत या ठिकाणी कामगारांना कामे मिळालेली नाहीत. याकरिता शासनाच्या पणन विभागाने योग्यते आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आहेत माथाडी कामगारांच्या मागण्या

१) खासगी बाजार समितीमधील माथाडी आनुषंगिक कामे बाजार समिती परवानाधारक व मंडळाच्या नोंदणीकृत कामगारांना मिळावीत.

२) माथाडी-मापाडी कामगार भरतीबाबत कामगारविरोधी आदेश रद्द करावेत.

३) नाशिक रोड मालधक्क्यावर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

४) माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करून कामगारांचे प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक व्हावी.

५) सुरक्षा रक्षक सल्लागार समिती,माथाडी मंडळ पुनर्रचना करून सदस्यांना नेमणूक मिळावी.

६) माथाडी मंडळ कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT