Power Loom Factory Fire Agrowon
ताज्या बातम्या

Power Loom Factory Fire : मालेगाव येथे यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्षस्थानी

मालेगाव शहरालगत असलेल्या द्याने शिवारातील यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले.

टीम ॲग्रोवन

नाशिक : मालेगाव शहरालगत असलेल्या द्याने शिवारातील यंत्रमाग कारखान्यांना आग (Power Loom Factory Fire) लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. आग लागल्याची दुर्घटना शनिवारी (ता.५) पहाटेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये यंत्रमाग कारखानदारांचे (Power Loom Factory) लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ४ ते ५ कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परिसरातील प्लॅस्टिक कारखान्याला आग लागली. त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने लगतच्या यंत्रमाग कारखान्यांपर्यंत भडका वाढत गेला. त्यामध्ये कच्चामाल सूत, तयार कपड्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

यामध्ये अनेक यंत्रमाग जळून खाक झाले. यंत्रमाग व्यावसायिक श्रावण वेताळ यांचे नुकसान असल्याचे समजते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत अनेक कारखान्यांचे नुकसान झालेले आहे. या दुर्घटनेत आर्थिक नुकसान मोठे झालेले आहे, मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचे समजते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Protection : वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतांना तार कुंपण द्यावे : बारड

Sericulture Technology : रेशीम उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

Property Sale and Purchase Deals: खरेदी-विक्री व्यवहारांसाठी ‘आधार’ प्रमाणीकरण बंधनकारक

Data Hub Development: महाराष्ट्र ‘आशियातील सर्वांत मोठे डेटा हब’ बनेल: विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

Moringa Processing Unit Inaugurated: आदिवासी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्याचा मार्ग; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्‌घाटन

SCROLL FOR NEXT