Wild Vegetable Agrowon
ताज्या बातम्या

Wild Vegetable : महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांना बाजारपेठ

Latest Agriculture News : औषधी गुणधर्म असलेल्या अनेक रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. आरोग्यवर्धक या रानभाज्यांना महोत्सवाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

Team Agrowon

Amravati News : औषधी गुणधर्म असलेल्या अनेक रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. आरोग्यवर्धक या रानभाज्यांना महोत्सवाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या परिसरात कृषी विभाग, ‘आत्मा’ तसेच श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, प्रादेशिक संशोधन केंद्र व स्त्री शक्ती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाचे उद्‍घाटक म्हणून श्री. कटियार बोलत होते. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, ‘रामेती’ अमरावतीचे प्राचार्य विजय चवाळे, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख, प्रादेशिक संशोधन केंद्राच्या प्रमुख वर्षा टापरे, स्त्री शक्ती मंचच्या अध्यक्षा प्रा. वृक्षाली ओक आदी या वेळी उपस्थित होते.

कटियार म्हणाले, की रानभाजी महोत्सवामध्ये जिल्ह्यातील बचत गट तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले असून या स्टॉलवर रानभाज्यांमध्ये गुळवेल, मटारू, भुई आवळा, राई भाजी, कपाळ-फोळी, रताळे, काटेमोड, आघाडा, केना, तरोडा, अंबाडी, दिंडी या भाज्यांचा समावेश असून या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

गुळवेल या भाजीमध्ये अँटी ऑक्स्डिेंटस् ॲटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म असून रक्तपेशी वाढविण्यास मदत करते. तसेच मधुमेह, त्वचेची समस्या या रोगांवर अतिशय उपयुक्त आहेत. राई ही भाजी कफ-पित्तदोष रक्त विकार, खाज, कुष्ठरोग, पोटांचे विकार यासाठी उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले. महोत्सवात सहभागी झालेले उदखेडचे दिनकर कानतोडे, धारणीच्या भगिरथी कास्देकर या प्रगतिशील शेतकऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र घातखेडच्या गृहविज्ञान विषयतज्ज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी ‘लोप पावलेल्या भरडधान्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. निंबी येथील प्रगतिशील शेतकरी लता पोहेकर यांनीही आहारातील रानभाज्यांचे महत्त्व या विषयावर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT