Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून अद्याप वंचितच

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात अकोट तालुक्यातील अकोलखेड, पणज, आणि उमरा या महसूल मंडलांना सर्वाधिक फटका बसला होता. याची तेव्हा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र अद्याप एकही रुपया शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

उमरा मंडलात काही गावांमध्ये या नुकसानीची मदत ३१ मार्चला मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. मात्र अनेकांना अद्याप दमडीही मिळाली नाही. पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

तेव्हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने शेतीपिके आणि फळबागेला हेक्टरी ३६ हजार वाढीव मदत जाहीर केली. बराच कालावधी लोटलेला असतानासुद्धा फळबागेची मदत मिळाली नाही.

शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. शेतकरी सातत्याने आर्थिक संकटात सापडलेला असून मदतीची अपेक्षा ठेवून आहे.
- सुहासअप्पा तेल्हारकर, अकोलखेड, जि. अकोला
या वर्षी अवकाळी मुळे हंगामातील पिकाबरोबरच भाजीपाल्याच्‍या पिकाचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.
- शिरीष महाले, शिवपूर
अकोट तालुक्यातील काही प्रमाणात ओलिताची सोय आहे. त्यामुळे संत्रा बागा आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे या बागांचे सातत्याने नुकसान होत आहे.
- शशिकांत गयधर, वस्तापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT