Damaged Road Agrowon
ताज्या बातम्या

Damaged Road : मंगरूळपीर-मानोली रस्ता पुन्हा उखडला

मागील वर्षात रस्त्याचे काम सुरू झाले. कासवगतीने हे काम वर्षभर चालले. पण दोनच महिन्यांत हे काम उखडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

टीम ॲग्रोवन

मंगरूळपीर, जि. वाशीम ः येथील मंगरूळपीर ते मानोली रस्ता (Mangrulpir-Manoli Road) दोन दशकापासून समस्याग्रस्त रस्ता बनला होता. या रस्त्यासाठी अनेक तक्रारी, उपोषण, आंदोलने झाली. मागील वर्षात रस्त्याचे काम सुरू झाले. कासवगतीने हे काम वर्षभर चालले. पण दोनच महिन्यांत हे काम उखडल्याने (Damaged Road) नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मंगरूळपीर ते मानोली हा रहदारीचा रस्ता असून मानोली परीसरातील दहा गावांना बाजारपेठेशी जोडणारा मुख्य रस्तासुद्धा आहे. या रस्त्यावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. अनेक महिने रखडलेला रस्ता आता दोन महिन्यांतच उखडल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागतो.

या रस्त्यावर विविध शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्याची जास्त वर्दळ राहते. या विद्यार्थ्यांना रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली. संबंधित विभागाने थातुरमातूर केलेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी मानोली परीसरातील सायखेडा, निंबी, अरक, पिंप्री,मोतसावंगा, रामगाव, गोलवाडी, चिंचाळा, शेलगाव येथील नागरिकांनी केली आहे.

मंगरूळपीर ते मानोली रस्ता का होत नाही. हा रस्ता दुरुस्तीसाठी २० वर्षे का लागतात आणि अर्धवट झालेला रस्ताही दोन महिन्यात उखडल्याने हे चिंतेची बाब आहे.

- हरिश्‍चंद्र चव्हाण, गोलवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT