Cashew Orchard  Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Orchard : आरोसमध्ये आगीत आंबा, काजूची झाडे जळाली

जिल्ह्यात आंबा, काजुच्या बागांना आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत दहा ते पंधरा हजार झाडे आगीमध्ये जळून नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील आरोस (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत ५० एकरमधील सुमारे तीन हजारांहून अधिक झाडे जळाली. या भागातील २१ शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान (Cashew Crop Damage) झाले आहे.

जिल्ह्यात आंबा, काजुच्या बागांना (Mango Cashew Orchard) आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत दहा ते पंधरा हजार झाडे आगीमध्ये जळून नुकसान झाले आहे.

दरम्यान आतापर्यंत लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीपेक्षा अनेक पटींनी नुकसान आरोस येथे लागलेल्या आगीत झाले आहे. आरोस कळगुंटवाडी परिसरात ही आग लागली.

त्यानंतर ही आग परिसरातील ५० एकरमध्ये पसरली. वाऱ्याच्या वेगामुळे आगीचा भडका उडाला. झपाट्याने आग आंबा, काजू बागांमध्ये घुसली. बागायतदार आणि स्थानिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

या आगीत बागायतदार कृष्णा कुबल, सखाराम सावंत, दत्तगुरू दळवी, रामचंद्र कासले, राजाराम दळवी, गुंडू कळंगुटकर, दत्तगुरू कुबल, बाबूराव कळंगुटकर, विलास कळंगुटकर, रमाकांत कळंगुटकर, भिवनेश कळंगुटकर, नर्मदा कोरगावकर, भरत कळगुंटकर, सावित्री कळंगुटकर, सीताराम कळंगुटकर, पांडुरंग कळंगुटकर, सुभाष कळंगुटकर, नामदेव कळंगुटकर, मोहन कळंगुटकर, अनिल कळंगुटकर, गजानन नाईक, शांताराम कुबल आदी शेतकऱ्यांचे तीन ते चार कोटींचे नुकसान झाले. शेतकऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT