Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe : मंडळ अधिकाऱ्यासह महिलेला ५० हजारांची लाच घेताना अटक

पाथर्डी परिसरातील जमिनीच्या तक्रारी अर्जावरील निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम खासगी महिलेमार्फत स्वीकारल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह लाच स्वीकारणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.

टीम ॲग्रोवन

नाशिक : पाथर्डी परिसरातील जमिनीच्या तक्रारी अर्जावरील निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) रक्कम खासगी महिलेमार्फत स्वीकारल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह लाच स्वीकारणाऱ्या महिलेला अटक (Arrest In Bribe Case) करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पुरुषोत्तम दत्तात्रय पराडकर (४०) असे मंडळ अधिकाऱ्याचे, तर केतकी किरण चाटोरकर (४१, रा. पाटील गार्डन, चार्वाक चौक, इंदिरानगर) अशी दोघा लाचखोर संशयितांची नावे आहेत.

जमिनीसंदर्भातील तक्रारीचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी पाथर्डीचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पराडकर यांनी संशयित महिला केतकी चाटोरकर यांच्या मार्फत एक लाखाच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीतही पंच व साक्षीदारासमोर संशयित महिला चाटोरकर यांनी लाचेची मागणी केली. ५० हजार रुपये पराडकर यांनी संशयित केतकी यांना स्वीकारण्यास सांगितले.

त्यानुसार तक्रारदारांकडून ५० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व सापळा अधिकारी वैशाली पाटील, पोलिस नाईक शरद हेंबाडे, राजेंद्र गिते, महिला अंमलदार शीतल सूर्यवंशी यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT