Malegaon Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Malegaon Sugar Factory : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माळेगाव’चा सन्मान

‘बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणि सामाजिक जीवनातही मूलभूत बदल घडवून आणण्याचे श्रेय माळेगाव कारखान्याला जाते.

Team Agrowon

माळेगाव ः माळेगाव कारखाना (Malegaon Sugar Factory) प्रशासनाने उस गाळपासाठी (Sugarcane Crushing) आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला. ताजा ऊस गळिताचे द्विसूत्री धोरण राबविले. परिणामी, साखर उतारा (Sugar Recovery) गतवर्षी १२.४० टक्क्यांनी वाढला.

उपपदार्थ निर्मितीमध्येही कारखान्याने घेतलेली आघाडी आदी प्रशासकीय कार्यांची दखल घेत व्हीएसआय (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) संस्थेने शनिवारी (ता.२१) कारखान्याचा द्वितीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार देऊन गौरव केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व अधिकाऱ्यांचा गौरव केला.

कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, तानाजी कोकरे, रंजन तावरे, केशवराव जगताप, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, तानाजी देवकाते, मंगेश जगताप, गुलाबराव गावडे, फॅक्टरी मॅनेजर अनिल वाबळे, चीफ केमिस्ट विकास फडतरे यावेळी उपस्थित होते.

अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले, ‘बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणि सामाजिक जीवनातही मूलभूत बदल घडवून आणण्याचे श्रेय माळेगाव कारखान्याला जाते.

इथेनाॅल, डिस्टलरी, विजेसारखे पूरक व्यवसाय, शैक्षणिक वातावरण विकसित होण्यासाठी येथील संचालक मंडळ व कामगारांनी पवार कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली दिलेले योगदान महत्त्वपूर्ण ठरते.’

पुरस्कारासाठीचे निकष

सन २०२१-२२ गळीत हंगामात मिळालेला १२.०४ टक्के साखर उतारा, उताऱ्यात ०.८६ टक्क्यांनी वाढ, साखर तयार करण्यासाठी बगॅसचा वापर १९.६४ टक्के, ताज्या उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप, उपपदार्थ निर्मिती प्रकल्पातून लक्षवेधी उत्पन्न, ऑॅफ सीझनमध्ये अल्कोहोल, वीजनिर्मितीचे उच्चांकी उत्पादन.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT