Devendra Fadanavis Agrowon
ताज्या बातम्या

G-20 Conference : ‘जी-२०’निमित्त नागपूरचे ब्रँडिंग जागतिक दर्जाचे करा

जी - २० परिषदेनिमित्त २१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशांतील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचीन व प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडिंग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २४) दिले.

टीम ॲग्रोवन

नागपूर : जी - २० परिषदेनिमित्त (G-20 Conference) २१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशांतील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचीन व प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडिंग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी शनिवारी (ता. २४) दिले.

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी येथे जी-२० परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, महानगरपालिका, सुधारप्रन्यास व जिल्हा प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पूर्वतयारीचा आढावा सादर केला. विमानतळ ते प्रमुख महामार्गांचा कायापालट या काळात केला जाईल. मुंबईप्रमाणेच नागपूर येथे तयारी सुरू झाली असून, प्रमुख रस्ते, बैठकीची स्थळे, ज्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत.

त्या त्या ठिकाणी प्राधान्याने सजावट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, की प्रगतिपथावर असणारी कामे, प्रस्तावित कामे मार्चपूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करा. या बैठकीला उपस्थित प्रधान सचिव दीपक कपूर यांनीही मिहान व अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती बैठकांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे सादर व्हावी, अशा सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing: देशातील खरीप पेऱ्यात चार टक्के वाढ

India Monsoon 2025: देशात सरासरी पाऊसमान, वितरण मात्र असमान !

Monsoon Rain: राज्यात वाढणार पावसाचा जोर

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT