Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Onion Crop Damage : उन्हाळी कांदा, तीळ पिकासह फळबागांचे मोठे नुकसान

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जून २०२२ ला खरीप हंगामात उशिरा पाऊस झाला. त्यामुळे पेरणी उशिरा झाली. तसेच ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान परतीच्या पावसाने काढणीस आलेला खरीप हंगाम हातचा गेला.

Team Agrowon

Beed News तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस पडत आहे. त्याचबरोबर गारपीट (Hailstorm) होत आहे. शुक्रवारी (ता. ५) दुपारी जोरदार वादळी पाऊस झाला.

त्यामुळे तालुक्यातील आरणवाडी, चोरंबा, थेटेगव्हाण, जहागीर मोहा आदी गावांत काढणीस आलेल्या उन्हाळी कांदा, तीळ या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जून २०२२ ला खरीप हंगामात उशिरा पाऊस झाला. त्यामुळे पेरणी उशिरा झाली. तसेच ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान परतीच्या पावसाने काढणीस आलेला खरीप हंगाम हातचा गेला.

तसेच रब्बी हंगाम ढगाळ वातावरणाने नुकसानकारक ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कसेबसे शेतकरी तात्पुरत्या पाण्याच्या उपलब्धतेवर उन्हाळी पिके घेतात. तालुक्यात उन्हाळी पिकांची यंदा मोठी लागवड झाली आहे. मात्र पंधरवड्यापासून तालुक्यात सतत वादळी पाऊस पडत आहे.

शुक्रवारी तालुक्यातील बहुतांश भागांत जोरदार वादळी पाऊस झाला. यात अरणवाडी, चोरंबा, सोनीमोहा, जहागीर मोहा, चिंचपूर गांजपूर या गावांना मोठा फटका बसला. उन्हाळी कांदा, भुईमूग, तीळ, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

पाणी असल्याने दीड एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली. आता कांदा काढण्यास आला, मात्र मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कांदा जमिनीतच सडून गेला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी.

- लहू फुटाणे, शेतकरी, अरणवाडी, ता. किल्लेधारूर, जि. बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे

Agriculture Irrigation Challenges: मोटारपंप बंदीच्या निर्देशांमुळे नवे संकट : किशोर वडेट्टीवार

Farmers Issue: कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा : खासदार अमर काळे

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

SCROLL FOR NEXT