Maize  Agrowon
ताज्या बातम्या

Maize Sowing : खानदेशात मका लागवडीत वाढ

खानदेशात रब्बीत मका लागवडीत वाढ झाली आहे. क्षेत्र मागील दोन हंगामांच्या तुलनेत सुमारे आठ हजार हेक्टरने वाढले असून, सुमारे ५२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात रब्बीत मका लागवडीत (Maize Cultivation) वाढ झाली आहे. क्षेत्र मागील दोन हंगामांच्या तुलनेत सुमारे आठ हजार हेक्टरने वाढले असून, सुमारे ५२ हजार हेक्टरवर लागवड (Maize Sowing) झाली आहे.

सर्वाधिक सुमारे ३५ हजार हेक्टर एवढी लागवड जळगाव जिल्ह्यात झाली आहे. त्यापाठोपाठ धुळ्यात सुमारे १२ आणि नंदुरबारात सुमारे पाच ते साडेपाच हजार हेक्टरवर मका पीक आहे. यंदा गहू पिकाऐवजी मका पिकाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. गहू पिकाची जागा मक्याने घेतल्याने गव्हाचे क्षेत्र काहीसे घटले आहे. अनेकांनी पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करून मक्याची लागवड केली आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, यावल, रावेर, चोपडा, जामनेर, पाचोरा या भागांत मका पीक अधिक आहे. धुळ्यात शिरपूर तालुक्यात आणि नंदुरबारात तळोदा व शहादा तालुक्यात मका पीक आहे. मागील तीन वर्षे मका पिकात लष्करी अळीचा प्रकोप कायम आहे. परंतु मागील दोन वर्षे मक्याचे दर स्थिर राहिले.

गेल्या वर्षी कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मक्यास मिळाला. यंदाही दर स्थिर आहेत. चारा व धान्य यातून बऱ्यापैकी निधी मिळत असल्याने शेतकरी मक्याकडे वळले आहेत. यंदा जलसाठे मुबलक आहेत. चांगला पाऊस झाल्याने पुढे टंचाई कमी राहील, असे दिसत आहे.

यामुळे मका पिकाची लागवड सुरूच आहे. काही शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या मका वाणांना पसंती देत आहेत. जळगाव जिल्ह्यातील तापी, गिरणा काठी केळीची काढणी पूर्ण झालेल्या जमिनीतही मक्याची लागवड झाली आहे. यंदा खरिपात लष्करी अळीचा प्रकोप कमी होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT