K Chandrashekhar Rao Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : अब की बार, किसान सरकार; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना साद

देशामध्ये आज परिवर्तनाची गरज असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Agrowon

K. Chandrashekhar Rao नांदेड : ‘‘स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही (Agriculture Irrigation) पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्येत (Farmer Suicide) महाराष्ट्र पुढे आहे, ही खेदाची बाब आहे,’’ अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी केली.

मुख्यमंत्री राव यांची नांदेडमध्ये रविवारी (ता. ५) सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ‘अब की बार किसान सरकार’ अशी घोषणाबाजी या वेळी करण्यात आली.

‘‘देशामध्ये आज परिवर्तनाची गरज असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री राव म्हणाले,‘‘देशात आता शेतकऱ्यांचे सरकार यायला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता कायदे बनवायला सुरुवात केली पाहिजे. शेतकऱ्यांचे सरकार बनवा, सर्व सुविधा मिळतील. महाराष्ट्रात धनाची कमी नाह, मनाची कमी आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत १३ महिने आंदोलन झाले. यात ७५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.’’

‘‘जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकऱ्यांनी ताकद दाखवावी. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात, हे दुर्दैव. शेतकरी आत्महत्येबाबत सरकारने उत्तरे दिली पाहिजेत. काँग्रेस गेले आणि भाजप आले, पण प्रश्न सुटले का? कधी हा घोटाळा तर कधी तो घोटाळा. कधी अंबानी तर कधी अदाणी, असे सुरु आहे,’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT