ताज्या बातम्या

Women Veterinarians Conference : महिला पशुवैद्यकांच्या राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद ‘माफसू’ला

भारतीय पशुवैद्य परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र शर्मा यांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठास भेट दिली. २०२३ मध्ये होणाऱ्या महिला पशुवैद्यकांच्या राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयास देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

टीम ॲग्रोवन

नागपूर : भारतीय पशुवैद्य परिषद (Indian Veterinarian Council) नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र शर्मा यांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठास (MAFSU) भेट दिली. २०२३ मध्ये होणाऱ्या महिला पशुवैद्यकांच्या राष्ट्रीय परिषदेचे (Women Veterinarian Conference) यजमानपद नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयास देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीश पातुरकर, भारतीय पशुवैद्य संघटनेच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लक्ष्मी श्रीनिवासन, कार्यकारी परिषद सदस्य संदीप इंगळे, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, मत्स्य विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. बोंडे, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सोमकुवर या वेळी उपस्थित होते.

डॉ. शर्मा यांनी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयास भेट देत विविध विभागाचा आढावा घेतला. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय हे भारतातील जुन्या महाविद्यालयापैकी एक असून येथील विद्यार्थ्यांनी देश-विदेश पातळीवर उल्लेखनीय कार्य केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या नात्याने डॉ. संदीप इंगळे यांनी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पदवी पूर्व मुलांच्या वसतिगृहास वॉटर कुलर आणि फिल्टर भेट दिला. या वेळी झालेल्या चर्चेत यावर्षीच्या महिला पशुवैद्यकांच्या राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील वर्षी जानेवारी २०२३ मध्ये ही परिषद होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dam Water Storage Update: नांदेड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३०.८६ टक्के पाणीसाठा

Raigad Safety Alert: रायगडला सतर्कतेचा इशारा

Modern Farming: शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पारंपरिक शेतीतून बाहेर पडावे : दीपक वैद्य

Nilanga Crop Competition Winners: निलंग्यात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Farm Loan Waiver Benefits: पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

SCROLL FOR NEXT