Farmer loans agrowon
ताज्या बातम्या

Farmer Loans : मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ

MP Cabinet Decision : मध्यप्रदेश मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी 2123 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Farmer Loans : मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील 11.19 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यासाठी 2,123 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम आणि व्याज एकत्रितपणे दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .

मागील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. अशा थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी गेल्या वर्षी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली होती की, थकबाकीदार शेती कर्जावरील व्याज राज्य सरकार बँकांमध्ये जमा करेल. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी सहकारी बँका आणि सोसायट्यांकडून घेतलेल्या कर्जावर थकबाकीदार शेतकऱ्यांचे व्याज भरण्यासाठी 2,123 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना सरकारकडे अर्ज करावा लागेल. बॅंका आणि सहकारी संस्थांनी अशा व्यक्तींची यादी एका पोर्टलवर प्रसिद्ध करावी लागेल. त्यानंतर त्यांना कर्जाच्या व्याजमाफीचा लाभ मिळेल.

यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती कर्जाची परतफेड केली नसल्याचा आरोप मुख्यमंत्री चौहान यांनी केला होता.तर काँग्रेसने दावा केला आहे की, त्यांच्या सरकारच्या काळात राज्यातील सुमारे 24 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT