Lumpy Affected Animal agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Affected Animal : लम्पीने लाखो रुपये किंमतीची जनावरे दगावली, पशुसंवर्धन विभाग करतोय काय?

Animal Dead Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने दगावलेल्या जनावरांसाठी शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी रोगाने थैमान घातले आहे. कागल तालुक्यातील मुरगूड व परिसरात जनावरांना लम्पी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या अचानक १० गायी दगावल्याने लाखो रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने तातडीने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

कागल, राधानगरी, गारगोटी परिसरात मोठ्या प्रमाणात लम्पीचा संसर्ग वाढला आहे. दरम्यान कागल तालुक्यातील मुरगुड येथील जांभूळ खोऱ्यातील गायी व बैलांना लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यान तातडीने लसीकरणाबरोबर अनेक शर्थीचे उपचार सुरू आहेत.

हरी ज्ञानू वंदूर, संतोष महादेव मेंडके, प्रकाश अण्णासो परीट, तानाजी भैरू कळांद्रे, अनिल आप्पासो पाटील, अरुण रामगोंडा पाटील. संदीप कृष्णा बरकाळे, प्रकाश धोंडिराम जाधव, नामदेव पांडुरंग जाधव, सुभाष निवृत्ती गोरुले, संदीप ढेंगे या शेतकऱ्यांच्या लाखापासून ते ४० हजार रुपयांपर्यंत किमतीच्या गायी दगावल्या. चरितार्थ चालवणारी दुभती जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

जिल्ह्यात लम्पी स्कीन या त्वचा आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. विशेष करून कागल, करवीर, भुदरगड व राधानगरी तालुक्यांत लम्पी स्कीनचा प्रार्दुभाव वाढत आहे. पशुसंवर्धन विभागही तातडीने अलर्ट मोडवर आला आहे.

आपत्कालीन बाब म्हणून इतर तालुक्‍यातील अधिकाऱ्यांच्या सेवाही लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी देण्यास सुरू केल्या आहेत. एप्रिलपासून ऑगष्टच्‍या पहिल्या आठवड्याअखेर १९२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून लम्पी स्कीन आजाराचा फैलाव काहीसा वाढल्‍याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत वेग कमी असला तरी दुर्लक्ष केल्यास पशुंना धोका निर्माण होऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT