Nira Canal Agrowon
ताज्या बातम्या

Nira Canal Lining : नीरा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

Team Agrowon

Pune News : शारदानगर (ता. बारामती ) येथील नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१७) बंद पाडले. अनेक वर्षांपासून ओलिताखाली आलेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, उचल पाण्याला अधिकृत परवाना द्या आणि नंतर काम चालू करा, अशी आग्रही मागणी करीत अनेक शेतकऱ्यांनी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाण्याअभावी मरण्यापेक्षा पाण्यासाठी आंदोलन करून मरू, अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली.

‘‘शारदानगर व मेडद आदी ठिकाणच्या शेतीला पाण्याची टंचाई होणार नाही, याबाबत काय धोरणात्मक निर्णय घेता येतो का, याची चर्चा जलसंपदा खात्यामधील वरिष्ठांशी केली जाईल. तसेच संबंधित शेतकऱ्यांची गावनिहाय स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले जाईल.

त्यानंतरच सर्वानुमते दुरवस्था झालेल्या कालव्याचे मजबुतीकरण केले जाईल,’’ असे लेखी म्हणणे उपविभागीय अभियंता आश्विन पवार यांनी आंदोलकांना दिले. अधिकाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलक रविराज तावरे, अर्जुन यादव, शिवराज पवार आदी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

पाऊस लांबला आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. नीरा देवधर धरणातील अतिरिक्त पाणी कमी होणार आहे. या प्रतिकूल स्थितीमुळे शेतीच्या पाण्याची भविष्यात होणारी टंचाई विचारात घेऊन जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण व मजबुतीकरण करण्यावर सध्या अधिकचा भर दिला आहे. त्यामध्ये शारदानगर, मेडद आदी ठिकाणी सध्या कालव्याच्या कामाला वेग आला होता.

कालव्याचे अस्तरीकरण झाले तर आमच्या शेतीला पाणी मिळणार नाही, जमिनी ओसाड पडतील, अशी ठोस भूमिका घेत अनेक आंदोलक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १७) जलसंपदा खात्याचे काम बंद पाडले. अस्तरीकरणाचे साहित्य कालव्याबाहेर काढायला लावले. त्यावेळी उपविभागीय अभियंता आश्विन पवार यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांची चर्चा केले व त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता, तुम्ही परस्पर कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू केले आहे. अस्तरीकरणामुळे पाण्याच्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत शासनस्तरावर सोडवत नाही, तोपर्यंत सदरचे काम बंद ठेवावे लागेल. अन्यथा आमचे प्राण केले तरी मागे हाटणार नाही.
- रविराज तावरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT