Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली पश्‍चिमेकडे सरकत असून, त्याच्या प्रभावामुळे आज (ता. २२) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली पश्‍चिमेकडे सरकत असून, त्याच्या प्रभावामुळे आज (ता. २२) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast) आहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा (Rainfall) तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे कायम आहे. तर पूर्व टोक बरेली, कानपूर, तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, मध्य प्रदेश, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. त्यामुळे मध्य भारतात ढगांची दाटी असून, पाऊस सुरू आहे.

घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असून, पूर्व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली असून, ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. आज (ता. २२) कोकणासह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता ओसरली

वायव्य झारखंड आणि आग्नेय मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीचे आज (ता. २२) ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा.

चौकट ----

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

लांजा ४०, माथेरान, खालापूर, कर्जत, रामेश्‍वर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :

लोणावळा, राधानगरी, महाबळेश्‍वर प्रत्येकी ४०.

विदर्भ :

अर्जुनी मोरगाव ६०, भंडारा, मोहाडी प्रत्येकी ५०, कुरखेडा, सावळी प्रत्येकी ४०, लाखणी, अरमोरी, मोदा प्रत्येकी ३०.

घाटमाथा :

कोयना ९०, अंबोणे ८०, दावडी, डुंगुरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी ७०, शिरगाव ६०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT