Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Wet Drought : पावसाचा जोर कमी; एका मंडलात अतिवृष्टी

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूरमधील स्थिती

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील मंडलांत मंगळवारी (ता.२७) (Heavy rainfall) सकाळपर्यंतच्या २४ तासांत बहुतांश मंडलांत तुरळक स्वरूपाची हजेरी राहिली. मात्र, जालना ग्रामीण मंडलात अतिवृष्टी(Wet Drought) झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ३९ मंडलांत हलका पाऊस झाला. आमठाणा मंडलात २१ मिलिमीटर, देवगाव २०.८, खंडाळा २१.५, सिद्धनाथ वडगाव २०, चौका येथे १७ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २२ मंडलात मध्यम ते दमदार पाऊस झाला. जालना तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला.

जालना ग्रामीण मंडलात ६६.८ मिलिमीटर पाऊस झाला. जालना शहर मंडलात ४७.८, शेवली १९.८, विरेगाव ३३.५५ ,वडगाव ४६.८ ,अंबड २३ ,वडीगोद्री २९, परतूर ६०, रोशनगाव २५, तर रांजणीत १९.३ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४६ मंडलांत हलका, मध्यम पाऊस झाला. बीड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. पाली मंडलात ४१.८ मि.मी नाळवंडी २१.८, पिंपळनेर २३.५, पेडगाव २२.३,

मांजरसुंबा १९.३, चौसाळा ५७.३, नेकनूर १९.३, लिंबागणेश २२, धोंडराई ३२.८, उमापूर ३१, तींतरवणीत २१.५ मिलिमीट रपाऊस झाला.

लातूरमधील ४९ मंडलांत हलक्या सरी

लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ४९ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील औराद मंडलांत २५.५ मिलिमीटर, आंबुलगा ४१,

झरी २५.३, आष्टा ३०.८ मिलिमीटर पाऊस झाला. इतर मंडलांत पावसाची हजेरी तुरळक राहिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील परांडा मंडलात २२.३, अनाळा २२, सोनारी ३८.५, अंभी ३२.५, माणकेश्वर २८.५, वालवड २३, ईट २१.५, जेवळी ३०, तर पारगाव येथे २२.८ मिलिमीटर पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT