ITI  Agrowon
ताज्या बातम्या

ITI Admission : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी उद्या अखेरचा दिवस

Aundh ITI : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक ते दोन वर्षे मुदतीच्या ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये १ हजार ६६४ प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक ते दोन वर्षे मुदतीच्या ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये १ हजार ६६४ प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उद्या (ता.११) प्रवेशाची अखेरची मुदत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता १० वी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण अशी आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रतिवर्षी साधारणपणे दोन हजार रुपये खर्च येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. परंतु निश्‍चित करून विकल्प भरलेले नाहीत, त्यांनी विहित मुदतीत पसंतीक्रमानुसार विकल्प भरावेत.

संस्थेत यंदापासून ‘एरोनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्विपमेंट फिटर’ हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विमान कंपनीमध्ये तसेच वाहन उद्योगामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत.

स्टेनो (मराठी) हा व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, खेरवाडी, वांद्रे. मुंबई- ५ यांच्यामार्फत राबविण्याचे प्रस्तावित आहे. ऑफलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रवेशासाठी संस्थेत प्रत्यक्ष भेट देऊन किंवा संस्थेच्या भ्रमणध्वनी हेल्पलाइन क्रमांक ८८५७९८४८२२ वर मार्गदर्शन घ्यावे. http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेश प्रक्रिया निश्‍चित करता येईल, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी कळविले.

एक वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम :

कारपेंटर (वूड वर्क टेक्निशियन), फोटोग्राफर, सुईंग टेक्नोलॉजी, सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्रजी), मेकॅनिक डिझेल, स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट (इंग्रजी), शिट मेटल वर्कर, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, मेसन, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर आणि प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर.

दोन वर्षे मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम

मशिनिस्ट, फिटर, मशिनिस्ट ग्राइंडर, मेकॅनिक मोटर व्हेइकल, मेकॅनिक मशिन टूल मेन्टेनन्स, टर्नर, टूल ॲण्ड डायमेकर (डाइज ॲण्ड मोल्ड), टूल ॲण्ड डायमेकर (प्रेस टुल्स, जिग्ज आणि फिक्चर), ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिव्हिल, इलेक्ट्रोप्लेटर, सर्व्हेअर, पेंटर (जनरल), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर, वायरमन आणि रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर टेक्निशियन.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT