Sugarcane Labor Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Labor : मजुरांची दिवाळी उसाच्या फडात

दिवाळी सणाला दहा दिवसांचा कालावधी असतानाच ऊसतोड मजूर घर सोडू लागल्याने यंदाही ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच साजरी होणार आहे.

Team Agrowon

नगर ः महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा (Sugar Mill) गाळप हंगाम सुरू होत आहे. कारखाने सुरू झाले असल्याने ऊसतोडणी मजुरांनी स्थलांतर सुरू झाले आहे. दिवाळी सणाला दहा दिवसांचा कालावधी असतानाच ऊसतोड मजूर घर सोडू लागल्याने यंदाही ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच साजरी होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उसाची उपलब्धता जास्ती असल्याने गाळप हंगाम (Sugar Harvesting Season) सहा ते सात महिने चालणार असल्याचे दिसत आहे.

राज्यात सुमारे दोनशे सहकारी व खासगी साखर कारखाने आहे. त्‍यातील १८० ते १९० साखर कारखाने गळीत हंगामात सुरू असतात. या कारखान्यांवर दहा ते बारा लाख मजूर काम करतात. सर्वाधिक मजूर बीड जिल्ह्यातील असून, त्या पाठोपाठ जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव, चाळीसगाव भागांतून अधिक मजूर स्थलांतरित होतात.

अलीकडच्या काळात ऊसतोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर होऊ लागला असला, तरी ऊसतोडणी मजुरांना मागणी असल्‍याचे दिसून येत आहे.दरवर्षी दसऱ्यापासून साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची लगबग सुरू असते. ऐन दिवाळीच्या काळात साखर कारखाने सुरू होतात. कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला, की मुकादम मजुरांना कारखान्यावर जाण्यासाठी आग्रह सुरू करतात. त्यामुळे मजुरांनाही दिवाळीच्या काळातच घर सोडावे लागते. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मजूर कारखाना परिसरात दाखल होत असून, राहुट्या द्यायचे काम सुरू असल्याने कारखाना परिसर मजुरांच्या लगबगीने गजबजला आहे.

यंदा उचलीत वाढ

ऊसतोड मजुरांना ऊसतोडणीला जाण्यासाठी तीन ते चार महिने आधीच उचल दिली जाते. दहा वर्षांपूर्वी तीस ते चाळीस हजार रुपये उचल होती. त्यात वाढ झाली आहे. आता एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत उचल दिली जात आहे. यंदाही हंगाम अधिक दिवस सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.

कामे उरकरण्याची लगबग

महाराष्ट्रातील सहकारी व खासगी साखर कारखान्याला ऊसतोडणीचे काम करणारे बहुतांश मजुर शेतकरी आहे. केवळ सिंचनाचा अभाव व पुरेसे शेती उत्पादन निघत नसल्याने शेतीसोबत ऊसतोडणीचे काम करावे लागतात. बीड, लातुर, नगर, जालना, विदर्भातील काही भागांत खरिपात बाजरी, कापूस, कांद्यासह इतर पिके घेतली जातात.

साखर कारखान्याचा हंगाम साधारण ऑक्टोबरपासून सुरू होतो. यंदा हंगाम सुरू झाला असल्याने ऊसतोडणीसाठी जाण्याची घाई असलेल्या मजुरांची शेतशिवारातील कामे उरण्याची लगबग सुरू आहे. त्यात पावसामुळे अडचणी येत आहेत. कुटुंबातील एक-दोन लोक घरीच थांबून शेतीची कामे उरकतात हा अनुभव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT