Narayan Rane  Agrowon
ताज्या बातम्या

Kunbi Certificate : सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत : नारायण राणे

Narayan Rane : मराठा आरक्षण देताना द्वेषाची भावना असू नये. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘राज्य सरकारने घटनेतील १५/४ आणि १६/४ या कलमांचा अभ्यास करून सरसकट कुणबी दाखले न देता राज्यातील गरीब ३८ टक्के मराठा समाजाला आरक्षण द्यावे,’’ अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. ‘‘सरसकट कुणबी दाखले द्यावेत, अशी ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही,’’ असेही ते म्हणाले.

भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत गुरुवारी (ता. १४) बोलताना राणे म्हणाले, ‘‘घटनेत तरतूद केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. ज्याला इतिहासाची जाण आहे, त्यानेच या विषयावर बोलावे. यापूर्वी जी आरक्षणे देण्यात आली तेव्हा मराठेच मुख्यमंत्री होते. मराठा आरक्षण देताना द्वेषाची भावना असू नये.

सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण समाप्त केले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी जे उपोषण केले त्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा करतो. सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. परंतु तशी मागणी ९६ कुळी मराठ्यांनी कधी केली नाही. त्यामुळे सरकारने तसा विचार करावा.’’

उद्धव ठाकरेंवर टीका

नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांवरून या वेळी हल्लाबोल केला. ‘‘उद्धव ठाकरे अडीच वर्षांत अडीच दिवसदेखील मंत्रालयात आले नाहीत आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत,’’ असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT