Kukadi Canal Agrowon
ताज्या बातम्या

Kukadi Canal : कुकडी डावा कालवा दुरुस्तीची गरज

कुकडी डाव्या कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले असून या कालव्याचे तत्काळ अस्तरीकरण आणि दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

आळेफाटा, ता. ९ : कुकडी डाव्या कालव्याचे अस्तरीकरण (Kukadi Canal) ठिकठिकाणी फुटले असून या कालव्याचे तत्काळ अस्तरीकरण (Canal Lining) आणि दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणावर असलेला कुकडी डावा कालवा हा पुणे व नगर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा महत्त्वपूर्ण कालवा आहे. हा कालवा येडगाव, पिंपळवंडी, बोरी, साळवाडी, झापवाडी निघोज, कर्जत, करमाळा या ठिकाणापर्यंत २५० किलोमीटर अंतर आहे.

‘संपूर्ण कालव्याची दुरुस्ती करा’

कालव्याचे निघाल्याने कालव्याची माती पाण्याने वाहून जाऊ लागली असून हा कालवा दोन दिवसांपूर्वी साकोरी गावच्या हद्दीत फुटून बाजूला असलेल्या शेतांमध्ये पाणी जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

पाटबंधारे खात्याच्या वतीने फुटलेल्या कालव्याचे कामाला देखील सुरुवात केली आहे, परंतु भविष्यात इतर ठिकाणी हा कालवा फुटू नये, यासाठी या संपूर्ण कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हजारो लिटर पाणी वाया

तीन वर्षांपूर्वी कर्जत-करमाळा या ठिकाणी भगदाड पडून हा कालवा फुटला होता. तेव्हा मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी जाऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, तसेच हा कालवा ज्या ठिकाणाहून सुरू झाला. त्या ठिकाणापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीगळती होते. बोरी बुद्रुक येथे कालव्याच्या भिंतीमधून गळती होऊन दर सेकंदाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

कालव्याचा आढावा

२५ हून अधिक वर्षे जुना

२५० किलोमीटर अंतर

२००८ मध्ये दुरुस्ती

तीन वर्षांपूर्वी कर्जत-करमाळा येथे कालव्याला भगदाड

काही दिवसांपूर्वी साकोरी गावच्या हद्दीत कालवा फुटला

दुरुस्तीची गरज का?

१३०० क्युसेसने पाणी सोडले जाते

अस्तरीकरणाला ठिकठिकाणी भेगा पडून निघाले

आतील बाजूस मोठ-मोठे खड्डे

कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती

अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्यामुळे सिमेंट निघाले

कालव्यात अनेक ठिकाणी झाडे, झुडपे वाढली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT