Road Agrowon
ताज्या बातम्या

Farm Road Work : शेतरस्त्याचे काम तातडीने करा

Agriculture News : शेत रस्त्याचे काम तातडीने करून द्यावे, अशी मागणी भारत कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Team Agrowon

Akola News : शेत रस्त्याचे काम तातडीने करून द्यावे, अशी मागणी भारत कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर या गावात धरणाचे काम २०२० मध्ये पूर्ण झाले. शेतकऱ्यांचे शेतात जायचे रस्ते या धरणाखाली गेले होते.

तेव्हा धरण बांधत असताना अधिकाऱ्यांनी नवीन शेत रस्ते बांधून मिळतील अशी वेळोवेळी आश्‍वासने दिली. नवीन शेत रस्त्यांसाठी सर्व्हे, मोजमाप, आखणी सर्व काही होऊनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना रस्ता मिळाला नाही.

२० टक्क्यांवर धरणात पाणी भरले, की शेतात जायला जागाच नसते. शेतकऱ्यांनी तेव्हापासून मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले. उपोषण, आंदोलने केली. परंतु अजूनही न्याय मिळाला नाही.

त्यामुळे या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) कारंजा येथील शेतकऱ्यांनी भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बुधवारी (ता. २१) बैठक घेत हा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले.

या वेळी मनोहर तायडे, गणेश तायडे, सागर भिसे, ज्ञानेश्वर तायडे, पुरुषोत्तम तायडे, गजानन खरटे, सुभाष तायडे, तुकडाजी तायडे, एकनाथ नागे, संजय नागे, देविदास बोळे, ज्ञानेश्‍वर अवारे, माधव भारसाकळे आदी शेतकरीही उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT