Rain Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Monsoon Update : २२ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला अंदाज

Kolhapur Rain : आठ दिवसांहून अधिक काळ गायब झालेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकऱ्याला थोडा आधार मिळाला आहे.

Team Agrowon

Kolhapur Rain News : मागच्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूरकरांना काल थोडा दिलासा दिला. शहर, परिसर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी काल (ता.१७) दुपारनंतर पावसाने दमदार सुरूवात केली. आठ दिवसांहून अधिक काळ गायब झालेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकऱ्याला थोडा आधार मिळाला आहे. दरम्यान काल झालेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचले होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात २२ ऑगस्टपर्यंत पाऊस असणार आहे. तर २० ऑगस्टपर्यंत दमदार पावसाची शक्यता आहे. २१ व २२ ऑगस्टपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मागच्या ८ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. पंचगंगेसह जिल्ह्यातील दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांची, ओढ्यातील पाणी कमी झाले आहे. तर माळरानावर पिकवलेल्या ज्वारी, भुईमूग, सोयाबीनला सध्या पाण्याची गरज आहे. पाऊस नसल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली होती. गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांत इतर ठिकाणी दुपारच्या वेळी उन्हाळ्यासारखे ऊन पडत होते.

हवेत कमालीची उष्णता वाढली होती. यामुळे शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. बुधवारी पहाटेपासून आकाशात ढगांची गर्दी राहिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास कागल, चंदगड पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील काही भागात हलका पाऊस झाला.

काल दुपारनंतर कोल्हापूर शहरात जोरदार पावसाने आगमन केले. अचानक पाऊस सुरू झाल्याने पादचारी, दुचाकी, फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रस्त्याकडेला असलेले झाड, पत्र्याचे शेड, घराचा आसरा घेऊन अनेकजणांनी पावसापासून बचाव केला. अर्धा तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर काही अंतराने पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT