Agrowon Agricultural Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Agriculture Exhibition : ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात ज्ञानाचा जागर

दररोज अभ्यासपूर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय निवडक व तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांचा या चर्चासत्रांमध्ये ‘ॲग्रोवन’च्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

Team Agrowon

औरंगाबाद ः चिकलठाणा ‘एमआयडीसी’मधील ‘कलाग्राम’मध्ये १३ ते १६ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात (Sakal Agrowon Agriculture Exhibition) आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कृषी निविष्ठा, खते- बियाणे (Seed), कृषिपूरक उद्योग (Agri Based Businss), आधुनिक अवजारे पाहण्याची, माहिती घेण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेच;

पण त्याचबरोबर प्रयोगशील शेतकरी आणि विविध विषयांतील कृषी तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी दररोज अभ्यासपूर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय निवडक व तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांचा या चर्चासत्रांमध्ये ‘ॲग्रोवन’च्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

विशेष चर्चासत्रांमध्ये गटशेतीमधील संधी आणि केसर आंबा उत्पादनवाढीचे तंत्र, जमीन सुपीकता वाढविणारे शून्य मशागत तंत्र, कोरडवाहू शेतीची नवी दिशा, रेशीम उद्योगातील संधी आणि मोसंबी, डाळिंब व्यवस्थापनाबाबत प्रयोगशील शेतकरी आणि फळबाग तज्ज्ञ सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. चर्चासत्रांच्या निमित्ताने प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘कन्हैया अॅग्रो’ आहेत. तसेच असोसिएट पार्टनर म्हणून बसवंत गार्डन हे आहेत. याशिवाय केबी, चितळे डेअरी, एमआयटी औरंगाबाद, तृप्ती हर्बल, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मेडा महाऊर्जा, आत्मा औरंगाबाद हे को-स्पॉन्सर्स आहेत; तर इफ्को हे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत.

विश्‍वासराव पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने लोहारा (जि. जळगाव) येथील शाश्‍वत शेतीचे तंत्र विकसित करणारे प्रयोगशील शेतकरी कृषिरत्न विश्‍वासराव पाटील यांच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

चर्चासत्रांचे विषय आणि तज्ज्ञ

१३ जानेवारी (शुक्रवार)

सकाळचे सत्र ः

विषय ः गटशेतीमधील संधी, केसर आंबा उत्पादनवाढ, विक्री तंत्र

वक्ते ः १) डॉ. बी. एम. कापसे, फलोत्पादन तज्ज्ञ

२) तानाजी वाडीकर, प्रयोगशील शेतकरी (नागलगाव, जि. लातूर)

१४ जानेवारी (शनिवार)

सकाळचे सत्र ः

विषय ः जमीन सुपीकता वाढविणारे शून्य मशागत तंत्र

वक्ते ः १) प्रताप चिपळूणकर, प्रयोगशील शेतकरी, कोल्हापूर

२) दीपक जोशी, प्रयोगशील शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

३) अतुल मोहिते, प्रयोगशील शेतकरी, टापरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

दुपारचे सत्र ः

विषय ः कोरडवाहू शेतीची नवी दिशा

वक्ते ः १) उदय देवळाणकर, कृषी तज्ज्ञ, औरंगाबाद

१५ जानेवारी ( रविवार)

सकाळचे सत्र ः

विषय ः रेशीम उद्योग ः गरज आणि संधी

वक्ते ः

१) दिलीप हाके, उपसंचालक, रेशीम, मराठवाडा विभाग

२) अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना

३) भाऊसाहेब निवदे, प्रयोगशील रेशीम उत्पादक, मच्छिंद्रनाथ चिंचोली, ता. घनसावंगी, जि. जालना

४) संपत करताडे, प्रयोगशील रेशीम उत्पादक, चौंढाळा, ता. पैठण, जि. औरंगाबाद

दुपारचे सत्र ः

विषय ः मोसंबी, डाळिंब फळबागेतील नवे तंत्र

वक्ते ः १) डॉ. संजय पाटील, प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना

२) विठ्ठल भोसले, प्रयोगशील डाळिंब उत्पादक, करमाड, जि. औरंगाबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming : भातशेतीने घरखर्चाचे आर्थिक गणित बिघडले

Gram Panchayat Development : ठाण्यातील ग्रामपंचायती होणार हायटेक

Farmers Relief Package: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न, पण तांत्रिक अडचणी आल्यास...; बावनकुळे असे का म्हणाले?

Farmer Relief : आमदार पवारांकडून बाराशे अतिवृष्टिग्रस्तांना सव्वा कोटी मदत

Farmers Protest: बीडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक! चुकीचे पंचनामे आणि तुटपुंज्या मदतीविरोधात किसान सभा आंदोलन पुकारणार

SCROLL FOR NEXT