Crop Insurance
Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : किसान सभेचे शिष्टमंडळ पीकविम्यासाठी दिल्लीत

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० चा पीकविमा (Crop Insurance) शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार दाखल केली नाही म्हणून कंपनीने नाकारला (Insurance Rejected By Crop Insurance Company). बुधवारी (ता.३) महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने बीड येथील शिष्टमंडळ पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत पोहोचले. या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता.४) कृषी सचिव मनोज कुमार यांना भेटून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कृषी सहसचिव रितेश चौहान (Ritesh Chauhan) यांच्याकडे शेतकऱ्यांची बाजू पुराव्यानिशी मांडली. त्यांनीही, ‘आपण यावर सहानुभूतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करू,’ असे सांगितले. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर तत्काळ निर्णय घेणे उचित ठरणार नाही, असेही कळविले.

दरम्यान, किसान सभा सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकावी, या साठी कायदेशीर पावले उचलत आहे. किसान सभेची केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी ठरलेली नियोजित भेट होऊ शकली नाही. त्यांना भेटून शेतकऱ्यांवर झालेला अन्याय त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न शिष्टमंडळ करीत आहे. कॉ. अजय बुरांडे, बीड जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. दत्ता डाके व जगदीश फरताडे बाजू मांडत आहेत. तर शिष्टमंडळाचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे हे करीत आहेत.

शेतकऱ्यांना प्रलंबित पीकविमा मिळावा, यासाठी बाजू मांडली आहे. न्यायल्यातही बाजू ऐकली जावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. शासन व न्यायव्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा आहे.
अजय बुरांडे, नेते, किसान सभा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT