Cashew Crop Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Processing : म्हैसुर येथील संस्थेशी किर्लोस विज्ञान केंद्र करणार सामंजस्य करार

Kirlos Science Center : काजू बी, काजू बोंडूवर प्रक्रियेचे प्रशिक्षण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी किर्लोस विज्ञान केंद्र म्हैसुर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेशी सामंजस्य करार करणार असल्याची माहिती किर्लोस विज्ञान केंद्राचे ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी दिली.

Team Agrowon

Sindhudurg News : काजू बी, काजू बोंडूवर प्रक्रियेचे प्रशिक्षण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी किर्लोस विज्ञान केंद्र म्हैसुर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेशी सामंजस्य करार करणार असल्याची माहिती किर्लोस विज्ञान केंद्राचे ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात काजू प्रकिया उद्योजकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मार्केटिंग आणि ब्रॅडिंग तज्ज्ञ सुरेश किशनानी, प्रदीप सावंत, शांताराम रावराणे, अरुणा लांडे, भास्कर काजरेकर, सुरेश नेरूरकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत काजू बी प्रमाणे काजू बोंडूपासून विविध प्रकिया पदार्थ बनविण्यावर चर्चा झाली. यावेळी श्री. सावंत यांनी अलीकडेच आपण म्हैसुर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेला भेट दिली. या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोंडूवर प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्यामुळे लवकरच या संस्थेची आम्ही सामंजस्य करार करणार आहोत. काजू प्रकिया उद्योग वर्षभर चालण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. काजू बी पुरवठा, काजू प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या मार्केटिंगचे नियोजन काजू सहकारी संस्थेद्वारे करण्यात येईल, असे देखील श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.

काजू बोर्डाची देखील लवकरच स्थापना होणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. या वेळी काजू प्रकिया उद्योजक श्री. नेरूरकर यांनी शेतकऱ्यांनी काजू विक्री करण्यापूर्वी ती योग्य पद्धतीने वाळविणे आवश्यक आहे.

वेंगुर्ला चार आणि सात जातींचे वर्गीकरण करून काजू बी ठेवली पाहिजे. तरच काजू बीला चांगला भाव मिळू शकेल.या बैठकीत प्राचार्य योगेश पेडणेकर, यशवंत पंडित, ज्ञानेश्वर केळजी, वैभव होडावडेकर, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT