Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing Nanded : नांदेड जिल्ह्यात चार लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season 2023 : अनेक भागात पेरण्या चालू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख ६१ हजार ६१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : ‘‘जिल्ह्यात अनेक भागात पेरण्या चालू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख ६१ हजार ६१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख ६६ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर एक लाख ४१ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा पावसाला उशिरा सुरवात झाल्याने मृग नक्षत्रात पेरण्या झाल्या नाहीत. यानंतर झालेल्या पावसामुळे जुलैमध्ये सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाली.

सध्या जिल्ह्यात पेरण्यांची कामे सुरु आहेत. आजपर्यंत ६० टक्क्यांनुसार चार लाख ६१ हजार ६१२ हेक्टरवर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

यात सर्वाधिक दोन लाख ६६ हजार ७४५ हेक्टरवर सोयाबीन, एक लाख ४१ हजार २१६ हेक्टरवर कपाशी, ३२ हजार ७६६ हेक्टरवर तूर, ७ हजार ८४० हेक्टरवर मूग, ७ हजार ४५२ हेक्टरवर उडीद, ४ हजार ४९२ हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली.

खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक पेरणी

क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी

ज्वारी ४४,७४० ४,४९२ १०.०४

मका ८२३ ७४८ ९०.८९

तूर ६७,४२३ ३२,७६६ ४८.६०

मूग २७,३९२ ७,८४० २८.६२

उडीद २९,६२५ ७,४५२ २५.१५

सोयाबीन ३,५३,३१४ २,६६,७४५ ७५.५०

कपाशी २,४१,२८२ १,४१,२१६ ५८.५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT