Banana Farming Agrowon
ताज्या बातम्या

Banana Farming : निर्यातक्षम भरघोस उत्पादन घेणाऱ्यांना केळी रत्न पुरस्कार देणार

केळीचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Banana Farmer Award अकोला ः केळीचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन (Banana Production) घेणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ केळीरत्न (Keli Ratna Award) कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन अध्यक्ष किरण चव्हाण यांनी केल्याची माहिती केळी संघाचे राज्य समन्वयक सचिन कोरडे यांनी दिली.

केळीरत्न पुरस्काराच्या अनुषंगाने चव्हाण व सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील हिंगणी (ता. तेल्हारा) येथे भेट देऊन श्री. कोरडे यांच्या बागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरस्काराबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले.

यानिमित्ताने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी निवडपूर्व आवेदन पत्र कशाप्रकारे भरावे याची माहिती याठिकाणी देण्यात आली.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना श्री. चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील, केळी संघाचे राज्य तज्ज्ञ संचालक नामदेव वलेकर, समन्वयक सचिन कोरडे, अकोट तालुकाध्यक्ष अनंता सरोदे यांनी मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय कार्यक्रमात निवडलेल्या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहितीही श्री. कोरडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT