Agriculture Education Agrowon
ताज्या बातम्या

Women Agriculture College : जिजामाता महिला कृषी महाविद्यालय चिपळूणला

Women Agriculture College : महाराष्ट्रातीलच नाही तर देशातले हे पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मान डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या शिक्षण संस्थेला मिळाला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : ः महिलांचा कृषी शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन, राज्य शासन आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मांडकी- पालवण (ता. चिपळूण) येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेला जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मंजूर केले आहे.

महाराष्ट्रातीलच नाही तर देशातले हे पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मान डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या शिक्षण संस्थेला मिळाला आहे. या संस्थेमध्ये जवळजवळ २५० एकर परिसर आहे.

याबाबत ते म्हणाले, की भारतातील एकूण शेती करणाऱ्यांपैकी जवळ जवळ ७० टक्के महिला शेती करतात. त्यामुळे भविष्यात कृषी शिक्षण घेतलेल्या महिला आधुनिक शेती करतील व उत्पन्नात वाढ होईल.

महिलांसाठी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह, मेस, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, वर्ग खोल्या, सुसज्ज ग्रंथालय इत्यादी बाबी नियमाप्रमाणे उपलब्ध आहेत.

या महाविद्यालयात २०२३-२४ शैक्षणिक वर्षांकरिता प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. या महाविद्यालयाचा कोड नंबर ११३११ असा आहे. ज्या विद्यार्थिनींनी इतर महाविद्यालयाला प्राधान्यक्रम दिला असेल, तर तो बदलून जिजामाता महाविद्यालयाला प्राधान्यक्रम देऊ शकतात. त्यासाठी वाढ दिली गेली आहे.

महाविद्यालयासाठी आमदार शेखर निकम यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अब्दुल सत्तार, राजेंद्र देवरे यांचाही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT