Ishved Biotech- Agreement with Israel's Company Agrowon
ताज्या बातम्या

Ishved Biotech : ईश्वेद बायोटेक -इस्राईलच्या कंपनीत करार

रोगमुक्त, उत्पादनक्षम वाण निर्मिती करणार; उतिसंवर्धित रोपे, बियाणे मिळणार

Team Agrowon

अकोला ः उतिसंवर्धित रोपे व बियाणे निर्मितीसाठी ईश्‍वेद बायोटेक व इस्रायली कंपनीमध्ये करार झाला असून, रोगमुक्त व उत्पादनक्षम वाण निर्माण केले जातील, अशी माहिती ईश्‍वेदचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली.

सिंदखेडराजा येथे ईश्‍वेद बायोटेकचे मुख्यालय असून आधुनिक उतिसंवर्धित तंत्रज्ञानाने फळबाग व वनशेती रोपे विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. यात आता आणखी भर पडली असून, केळी या पिकांमध्ये रोगमुक्त आणि चांगले उत्पादन देणारे वाण विकसित करण्यासाठी इस्राईलच्या कंपनीसोबत ईश्वेद बायोटेकने करार केला आहे. या करारांतर्गत आता उतिसंवर्धित रोपे व बियाणे निर्माण केले जाईल.

सोबतच इस्रायली तंत्रज्ञानाची सुद्धा देवाण-घेवाण केली जाणार आहे. हा करार ईश्वेद आणि शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे, असेही श्री. वायाळ म्हणाले.
सिंदखेडराजा तालुक्यातील माळसावरगाव येथे ईश्वेद बायोटेकने उतिसंवर्धित रोपे, बियाणे क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी केळीसह पेरू, डाळिंब, आंबा, जांभूळ, किवी, अंजीर, सीताफळाची रोपे उपलब्ध करून दिली आहेत.

फळबाग, भाजीपाला या क्षेत्रात शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरायला लावत दर्जेदार रोपे उपलब्ध करून दिली. इस्राईलची कंपनी व ईश्‍वेदमध्ये शुक्रवारी (ता. १६) करार करण्यात आला. इस्राईलमधील जिनोसर ॲग्रो कंपनीचे सीईओ ईनॉन, वरिष्ठ शास्त्रज्ञ नफाफ, ईश्‍वेदचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांची यावेळी उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mung Urid Threshing: मूग आणि उडीदाची मळणी करताना काय काळजी घ्यावी?

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ नका: उच्च न्यायालय

Farmer Payment: कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Turmeric Disease: हळदीवर कंदकुज रोगाचा धोका, नियंत्रणासाठी सोपे मार्गदर्शक उपाय

Cooperative Commissionerate: सावकारांनो, कर्ज देताना व्याजदराचा फलक लावा: सहकार आयुक्तालय

SCROLL FOR NEXT