Women Farmer Agrowon
ताज्या बातम्या

Beekeeping : महिला शेतकऱ्यांचा मधमाशी पालनासाठी राज्यांतर्गत अभ्यास दौरा

Beekeeping Business : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व श्री अशोक सिंगल मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील वडेश्वर, कुसवली, मोरमारेवाडी येथील ३० महिला शेतकऱ्यांनी नुकताच अभ्यास दौरा केला.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व श्री अशोक सिंगल मेमोरिअल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील वडेश्वर, कुसवली, मोरमारेवाडी येथील ३० महिला शेतकऱ्यांनी नुकताच अभ्यास दौरा केला. पुणे जिल्ह्याचे आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ व तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांचे मार्गदर्शनाखाली आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी सहायक घनश्याम दरेकर, अशोक सिंघल मेमोरिअल ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक माणिक गवळी यांनी नियोजन केले होते.

अभ्यास दौऱ्यात देशातील पहिले मधाचे गाव म्हणून नावलौकिक मिळविलेले मांघर येथे भेट दिली. मधूसागर मध उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष महादेव जाधव यांनी मांघर गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मधाचे संकलन करून त्याची प्रक्रिया करून स्वतःचा मधूसागर ब्रॅण्ड तयार करून त्याची विक्री व्यवस्था कशी निर्माण केली.

तसेच देशातील पहिले मधाचे गाव म्हणून नावलौकिक मिळविला इथपर्यंतचा सर्व प्रवास सांगून मधुमक्षिका पालन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर प्रत्यक्ष जंगलामध्ये मधपेटी कशी बसविली जाते. तसेच मध कसा काढला जातो, मधपेटीची काळजी कशी घेतली जाते यांविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

यानंतर मध संचालनालय येथे भेट देऊन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या विविध योजना, मध प्रक्रिया तसेच मधूबन म्युझियम इ.विषयी माहिती घेतली. यानंतर वाई येथे जिल्हा रेशीम अधिकारी यांचे कार्यालयास भेट देऊन रेशीम उद्योगाबद्दल रेशीम लागवड ते रेशीम उत्पादन, वाई येथील मॅप्रो गार्डनला भेट देऊन स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT