Dam Water  Agrowon
ताज्या बातम्या

Dam Water Stock : धरणांत पाण्याची आवक सुरू

Pune Weather Update : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये आठ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार, तर इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमीअधिक पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.

त्यामुळे १६ धरणांत नव्याने एकूण १.०१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. असाच पाऊस राहिल्यास धरणांत आणखी पाण्याची आवक वाढेल, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला आहे.

यंदा जून महिन्यात जवळपास २३ दिवस पाऊस नसल्याने धरणांनी चांगलाच तळ गाठला होता. काही धरणे कोरडी पडली होती. परंतु २४ जूनपासून पावसाने जोर धरला. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. सुरुवातीच्या दोन ते तीन दिवस धरणांत पाण्याची आवक झालेली नव्हती.

परंतु २६ आणि २७ जून रोजी पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे २७ जून पासून धरणांत नवीन पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. २६ जून रोजी वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडला. कळमोडी धरणक्षेत्रात ५० मिलिमीटर, टेमघर ३५, वरसगाव ३१, भामा आसखेड ३१, आंध्रा ३६, नीरा देवघर ३४ पानशेत २८ मिलिमीटर पाऊस बरसला. तर मुळशी, कुंडली घाटमाथ्यावर ८५ मिलिमीटर, शिरोटा ८४, ठोकरवाडी ५७, लोणावळा ८२ मिलिमीटर पाऊस पडला.

पश्चिम भागातील ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. धरणांत २७ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत ०.४१ टीएमसी एवढा येवा दाखल झाला होता. त्यामुळे धरणांतील पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली.

जिल्ह्यात २७ जून रोजी पावसाची स्थिती कायम राहिली होती. दिवसभर ढगाळ वातावरणासह पश्चिम पट्यात पावसाची संततधार सुरू होती. सायंकाळी काही प्रमाणात जोर अधिक होता. त्यामुळे बुधवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांच्या नऊ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळला.

यात प्रामुख्याने मुठा खोऱ्यातील वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ९७ मिलिमीटर पाऊस पडला असून पानशेत ९६, टेमघर ८०, खडकवासला ३१ मिलिमीटर पाऊस पडला. पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २८ मिलिमीटर, नीरा देवघर ३०, मुळशी ५४, लोणावळा धरणांच्या पाणलोट ३२ मिलिमीटर पाऊस पडला. तर कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, भाटघर, वीर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १४.७८ टीएमसीपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे.

या धरणांत सुरू झाली पाण्याची आवक

टेमघर, वसरगाव, खडकवासला, पवना, कळमोडी, भामा आसखेड, गुंजवणी, भाटघर, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, चिल्हेवाडी, विसापूर, उजनी, मुळशी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT