Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Pest : आचऱ्यात भातरोपांवर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव

Paddy Farming : वाढलेली आर्द्रता आणि शेतमळ्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे आचरा परिसरातील भातरोपांवर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : वाढलेली आर्द्रता आणि शेतमळ्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे आचरा परिसरातील भातरोपांवर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात सध्या भातरोप पुनर्लागवडीचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे भात रोपवाटिकांमध्ये पाणी साचले असून वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढले आहे.

त्यामुळे नाकतोड्यांचा प्रादुर्भाव भातरोपांवर दिसून येत आहे. भातरोपे काढणी करताना ही बाब शेतकऱ्यांच्या निर्दशनास येत आहे. भातरोपांच्या कोवळी पातीचे तुकडेतुकडे नाकतोड्यांकडून केले जात आहेत.

नाकतोड्यांच्या प्रादुर्भावामुळे आचरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा नाकतोड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आचरा येथील शेतकरी आबा सावंत यांच्या मळ्यांमध्ये पहिल्यांदा हा प्रादुर्भाव दिसून आला.

खाचरामध्ये असलेले पाणी आणि आर्द्रता यामुळे नाकतोड्यांचा प्रादुर्भाव आचरा परिसरात दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी भातरोपांवर क्लोरोपायरिफसची फवारणी कृषी विभागाच्या सल्ल्याने करावी.
- सुशीलकुमार शिंदे, कृषी सहायक, आचरा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT