Abinash Verma Agrowon
ताज्या बातम्या

इस्माचे महासंचालक अबिनाश वर्मा यांचा राजीनामा

अबिनाश वर्मा यांनी महासंचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे इस्माने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. वर्मा हे माजी प्रशासकीय अधिकारी असून गेली १२ वर्षांपासून ते इस्माच्या महासंचालकपदावर विराजमान होते.

Team Agrowon

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचालक (ISMA) अबिनाश वर्मा (Abinash Verma) यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इस्माने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

ब्राझीलनंतर सर्वाधिक साखर उत्पादन (Sugar Production) करणारा देश म्हणून भारत जगभरात ओळखला जातो. साखरेच्या जागतिक बाजारात भारताचा दबदबा आहे. ऑक्टोबरपासून (१ ऑक्टोबर २०२२) सुरु झालेल्या साखर हंगामानंतर भारताने आतापर्यंत ८० लाख टन साखर निर्यातीचे (Sugar Export) करार केले आहेत.

भारतीय साखर कारखान्यांनी कुठल्याही अनुदानाशिवाय विक्रमी स्वरूपात साखरेचे उत्पादन घेत जागतिक बाजारात निर्यात केलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षात ब्राझील, ऑस्ट्रेलिया, ग्वाटेमाला या जागतिक बाजारातील भारताच्या प्रतिस्पर्धी देशांनी भारताच्या साखर अनुदानाबाबत साशंकता व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

भारताविरुद्ध तशी रीतसर तक्रारही या देशांनी जागतिक व्यापार संघटनेकडे (WTO) दाखल केली आहे. जागतिक व्यापार संघटनेने याबाबत भारताला आपली बाजू मांडण्याची निर्देश दिले आहेत. जागतिक बाजारातील दरवाढीनंतर भारताने साखर उत्पादनासाठीचे अनुदान बंद केले आहे.

दरम्यान अबिनाश वर्मा (Abinash Verma) यांनी महासंचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे इस्माने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. वर्मा हे माजी प्रशासकीय अधिकारी असून गेली १२ वर्षांपासून ते इस्माच्या महासंचालकपदावर विराजमान होते.

त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय साखर उद्योग क्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वर्मा यांनी राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून या निर्णयामागील कारण सांगितले नाही. वर्मा यांच्या कार्यकाळात भारतातील साखरेचे उत्पादन वाढले, निर्यातीत वाढ झाली. पेट्रोलमध्ये इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचा निर्णय घेण्यात आला आणि इथेनॉल निर्मितीस चालना मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT