Agriculture Technology Agrowon
ताज्या बातम्या

Indian Science Congress : इंडियन सायन्स काँग्रेस देणार तंत्रज्ञानधिष्ठित शेतीला प्रोत्साहन

कोरोनानंतर पहिल्यांदाच ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे तब्बल तीन वर्षांनी आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाच्या यजमानपदाचा मान नागपूरला मिळाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी उपस्थित राहतील.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः ‘‘भारतीय शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित शेतीची (Agriculture Technology) संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये (Indian Science Congress) शेतीवर आधारित एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले जाईल. यातील निष्कर्ष थेट केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे मांडण्यात येतील. त्याचा कृषिविषयक धोरण ठरविताना उपयोग होईल,’’ अशी माहिती या चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रकाश इटनकर यांनी दिली.

कोरोनानंतर पहिल्यांदाच ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे तब्बल तीन वर्षांनी आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाच्या यजमानपदाचा मान नागपूरला मिळाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी उपस्थित राहतील. २०१९ मध्ये झालेल्या अखेरच्या सायन्स काँग्रेसचे आयोजन चेन्नई येथील कृषी विद्यापीठाकडे होते.

कृषी विद्यापीठाकडे आयोजन असल्याने त्यांनी पहिल्यांदाच शेती प्रश्‍नावर चर्चा व्हावी, यासाठी शेतीवर स्वतंत्र चर्चासत्र घेण्याचे ठरविले. ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये शेती विषयांवर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर २०२० ते २०२२ पर्यंत कोरोनामुळे आयोजनावर मर्यादा आल्या. मात्र आता आयोजनाचा मान नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कृषी विद्यापीठाला मिळाला आहे.

डॉ. इटनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२३ रोजी आयोजित या परिषदेला देशभरातील तब्बल ८०० शेतकऱ्यांची उपस्थिती राहील. यात मुख्य वक्‍ते म्हणून चार शेतकऱ्यांची नावे अंतिम केली आहेत. विदर्भातील काही शेतकरीदेखील प्रयोगशील शेती, तंत्रज्ञानाचा वापर व आधुनिक शेती या विषयावर विचार मांडतील.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, संशोधन संचालक डॉ. कुरकुरे, कृषी विद्यापीठाचे पसलावार हे मार्गदर्शन करतील. पाच जानेवारीला सकाळी दहा वाजता या चर्चासत्राचे उद्‍घाटन होईल.

शेतकरी वैज्ञानिक असावा व भविष्यातील शेतीचा वेध घेत तंत्रज्ञानावर आधारित शेतीची संकल्पना त्याच्या माध्यमातून रुजावी. त्यातून सकारात्मक परिणाम शेती क्षेत्रात व्हावे, असा उद्देश इंडियन सायन्स काँग्रेसमधील ॲग्री कृषी चर्चासत्राच्या आयोजनामागील आहे.

- डॉ. प्रकाश इटनकर, समन्वयक, कृषी चर्चासत्र, इंडियन सायन्स काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT