Dairy Business Agrowon
ताज्या बातम्या

Dairy Business : विक्रमगडमध्ये दुग्ध व्यवसायाकडे वाढता कल

तरुण शेतकऱ्यांची शेतीला जोड व्यवसाय म्हणून पसंती

Team Agrowon

वाडा : तालुक्यातील अनेक शेतकरी जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने चारा-पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला. त्यामुळे पशुपालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

शेती व्यवसाय करणे परवडत नसल्याने शेतीला जोड धंदा म्हणून या भागातील शेतकरी पशुपालनास पसंती देत आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढत आहे. यंदा जून महिन्यापासूनच तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने नदी, नाले, तलाव, विहिरींमध्ये चांगल्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पशुधनाचा चारा-पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. सध्या काही तरुण शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाळ जनावरांचे संगोपन करत आहेत.

याशिवाय गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील कोविडच्या प्रादुर्भावामुळे शहरात कामानिमित्त गेलेले तरुणही गावी परतले आहेत. तेही या दुग्ध व्यवसायात उतरले आहेत. तालुक्यात दुधाला अधिक मागणी असून भावही चांगला मिळत आहे. याशिवाय डेअरी चालकांकडूनही दुधाच्या दर्जानुसार भाव दिला जातो. तसेच देशी, संकरित आदी जातीच्या चांगल्या म्हशींची ७० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत किंमत असल्याचे जाळे येथील पशुपालक प्रदीप गोरे यांनी सांगितले.

तालुक्यात औद्योगिकीकरण वाढल्याने परप्रांतीय कामगारांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दुधाच्या मागणीतही वाढ होत आहे. शिवाय मुंबई, ठाणे, कल्याण भिवंडी व वसई ही शहरेही जवळ असल्याने वाड्यातून ताजे दूध मिळत असल्याने मागणीत वाढ झाली आहे.

पशुधनाच्या संख्येत वाढ

तालुक्यातील शेतकरी आता दुग्ध व्यवसायही करत आहेत. दरम्यान, मागील महिन्यात वाड्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव काही जनावरांना झाला होता. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले होते, परंतु आता या रोगाचा प्रादुर्भाव अाटोक्यात असल्याने तालुक्यात पशुधनाची संख्या वाढू लागली आहे.

मी उच्चशिक्षित असून नोकरी सांभाळून दुग्ध व्यवसायाकडे वळलो आहे. माझे दोन ठिकाणी म्हशींचे गोठे आहेत. या गोठ्यांतील सर्व दूध माझ्या डेअरीमध्ये येत असून, कुडूस येथेच सर्व दूध संपत आहे.

- सुधीर कडव, दुग्ध व्यावसायिक, सापने

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT