Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

Smart Agriculture : स्मार्ट शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

Agriculture Technology : भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येला अन्नसुरक्षा प्रदान करताना कमी होत चाललेले जमीन क्षेत्र व हवामानबदल ही दोन मोठी आव्हाने उभी आहेत. याबाबत व्यापक संशोधनाची गरज आहे.

Team Agrowon

Satara News : ‘‘कृषिक्षेत्रात रोबोटिक व ड्रोन यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत आहे. अशा नावीन्यपूर्ण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास स्मार्ट पद्धतीने कृषिक्षेत्राचा विकास शक्य आहे,’’ असे मत राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कृषीविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, आयआयटी रोपरचे मुकेश केस्तवाल, रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. डी. शाळिग्राम, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. गिरीश पठाडे, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर भारतात कृषिक्षेत्रात झालेल्या विकासाचे, हरित क्रांतीचे आपण साक्षीदार आहोत. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येला अन्नसुरक्षा प्रदान करताना कमी होत चाललेले जमीन क्षेत्र व हवामानबदल ही दोन मोठी आव्हाने उभी आहेत. याबाबत व्यापक संशोधनाची गरज आहे.’’

कुलपती डॉ. भोसले म्हणाले, ‘‘अलीकडे शेतीवरील उपजीविकेचे प्रमाण कमी होत चालले आहे. तसेच जमीन धारणा क्षेत्र कमी होत आहे. येत्या काळात आधुनिक पद्धतीचा अवलंब करत सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज आहे.’’

या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जल व्यवस्थापन व आधुनिक सिंचन तंत्र या विषयाच्या अनुषंगाने विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. देशातील विविध भागांमधून सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT