भंडारदरा जलाशय भरले !
भंडारदरा जलाशय भरले ! Agrowon
ताज्या बातम्या

Dam Water Level : भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

Team Agrowon

Ahmednagar Rain Update : अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात अजूनही पुरेसा पाऊस नाही. सध्या केवळ अकोले तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागात पाऊस पडत आहे. पाणलोटातील पावसामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांत पाणीसाठा वाढत आहे. आत्तापर्यंत भंडारदरा धरणात ६९ टक्के पाणी साठले आहे. मुळा, निळवंडे धरणांतही अकोल्यातील पावसामुळे पाणी जमा होत असले तरी जिल्ह्यातील अन्य धरणांत मात्र पाणीसाठा अल्प आहे.

नगर जिल्ह्यात यंदा उशिराने पाऊस आला असला तरी अजूनही अनेक भागात पाऊस नाही. त्याचा परिणाम खरीप पेरण्यांवर झाला आहे. पाऊस नसल्याने पेरण्याला उशीर होत आहे. सध्या केवळ अकोले तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी, भंडारदरा, हरिश्‍चंद्रगड परिसर, कळसूबाई परिसरातच पाऊस पडत आहे. येथेही नेहमीच्या तुलनेत पाऊस कमी आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणात यंदा आत्तापर्यंत पावणेचार टीएमसी पाणी आले असून धरण ६९ टक्के भरले आहे. निळवंडे धरणात अडीच टीएमसीच्या जवळपास यंदाच्या पावसाळ्यात पाणी जमा झाले असून धरणात आता ३२ टक्के पाणीसाठा आहे, तर मुळा धरणात सव्वादोन टीएमसी पाणी आले आहे.

भंडारदरा महिनाअखेर भरेल

नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसला तरी लोकांचे लक्ष मुळा, भंडारदरा, निळवंडे, जायकवाडी धरणांतील पाणीसाठ्याकडे असते. नगर शहरासह अनेक गावांची तहान ही धरणे भागवतात. भंडारदरा धरण अजून साडेतीन टीएमसी पाण्याने भरणार आहे. सध्या या भागात पावसाचा फारसा जोर नाही. मात्र सध्या सुरू असलेला एवढा असाच राहिला तरी भंडारदरा पंधरा दिवसांत भरेल अशी आशा आहे. दरवर्षी हे धरण पंधरा ऑगस्टच्या आधी भरते. भंडारदरा भरले की निळवंडेही लवकर भरते. सध्या कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात निसर्गसौंदर्य, फेसाळलले धबधबे पाहायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Controlled Tourism : संवेदनशील क्षेत्रात हवे नियंत्रित पर्यटन

Agriculture Policy : पंतप्रधानांचा शेती क्षेत्राबद्दलचा दावा अन् वास्तव

Agriculture Award : कृषी पुरस्कार निवडीची राज्यभर प्रक्रिया सुरू

Crop Competition : पीक स्पर्धांसाठी अर्ज स्वीकारणी सुरू

Crop Loan : शेतकऱ्यांना ९६ टक्के पीककर्जाचे वितरण

SCROLL FOR NEXT