Paddy Production Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Production : कर्जतमध्ये भात उत्पादनात वाढ

तालुक्यात यंदा ९,११० हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आहे. त्‍याचबरोबर १०० हेक्टरवर नाचणी तर १७ हेक्टरवर तूर, १६ हेक्टरवर भुईमूग, ४१ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी ८,९९० हेक्टरवर भात शेती करण्यात आली होती.

Team Agrowon

कर्जत ः तालुक्यात यंदा ९,११० हेक्टरवर भात लागवड (Paddy Production) करण्यात आली आहे. त्‍याचबरोबर १०० हेक्टरवर नाचणी (Ragi Cultivation) तर १७ हेक्टरवर तूर, १६ हेक्टरवर भुईमूग, ४१ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड (Vegetable Production) करण्यात आली आहे. मागील वर्षी ८,९९० हेक्टरवर भात शेती (Paddy Farming) करण्यात आली होती. या वर्षी भाताच्या उत्पादनात (Paddy Production) वाढ झाल्‍याची माहिती तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी दिली.

काही वर्षांपूर्वी शेतकरी रत्ना, जया या भात जातींचे पीक घ्‍यायचे. हे पीक तयार होण्यास १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो, मात्र आता त्‍याला पर्याय म्हणून कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन विद्यापीठाने कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारे सुधारित भात जाती बियाणे म्हणून कर्जत-७ आणि कर्जत-५ विकसित केली आहेत.

त्याचप्रमाणे कर्जत-३ लाही शेतकऱ्यांची अधिक पसंती आहे. या जातींची भात पिके अवघ्या ११५ ते १२५ दिवसांत तयार होत असून प्रति हेक्टर ४० ते ४५ क्विंटल भात उत्पन्न निघत असल्‍याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

१९९८ ला सह्याद्री हे संकरित वाण प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले महाराष्ट्रातील पहिलं तर भारतातील तिसरे संकरित वाण आहे. त्यानंतर याच संशोधन केंद्राने सह्याद्री २,३,४ या संकरित जाती विकसित केल्या आहेत.

त्यानंतर सह्याद्री ५ ही संकरित वाण भात संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरीने विकसित केले आहे. या पिकांचे प्रति हेक्टरी ६० ते ६५ एवढे उत्पादन निघते. मात्र बियाणेच उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

शेतकऱ्याला भात हमीभाव केंद्रावर विक्री करायचा असेल तर प्रथम शासनाच्या वेब साइटवर ऑन लाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्याने तसेच शेतीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना मुदतीत नोंदणी करता येत नाही. परिणामी हमी भावापासून वंचित राहावे लागते.

पारदर्शकता हवी

शासनाने शेतकऱ्यांना २०२२-२३ मधील भात खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी तसेच सातबारा पीक नोंदणीत पारदर्शकता असावी, अशी मागणी माजी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे महिन्याभरापूर्वी केली होती. भात खरेदी करताना शेतकऱ्यांना सातबाराही सादर करावा लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT