Nursery Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Nursery Scheme : रोपवाटिका योजनेच्या अनुदानात वाढ

२२ ऑगस्टपासून पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना लागू राहणार

Team Agrowon


अमरावती ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका (Nursery) योजनेच्या १.९० लाख रुपयांच्या अनुदानात ४८ हजारांनी वाढ करण्यात आली आहे. शेडनेट (Shednet) या घटकासाठी आता २.३८ लाख एवढे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान २२ ऑगस्ट २०२२ पासून पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना लागू राहणार असल्याचे कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत भाजीपाला पिकांच्या दर्जेदार व कीडमुक्‍त रोपांच्या निर्मितीवर प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्याच उद्देशाने अनुदान योजना राबविली जात आहे. यापूर्वी प्रति रोपवाटिकेसाठी ५.५५ ला रुपये खर्च ग्राह्य धरून ५० टक्‍के अनुदान देय होते. यातील शेडनेट या घटकाला प्रकल्प मूल्य ३.८० लाखांचे ५० टक्‍के म्हणजे १.९० लाख अनुदान देय होते.

शेडनेट उभारणीकरिता लागणारे साहित्य, वेल्डिंग, फॅब्रिकेशन, वाहतूक, मजुरी व स्टीलच्या दरात वाढ झाल्याने शेडनेटसाठी प्रकल्प मूल्यात ३.८० लाखांवरून ४.७५ लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकासाठी अर्ज करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT