Farmer agrowon
ताज्या बातम्या

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार, पीएम किसानच्या १४ वा हफ्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर

PM Kisan : यंदाचा पीएम किसानचा १४ वा हफ्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही.

Team Agrowon

PM Kisan Yojana 2023 : देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधी योजनेतून केंद्र सरकारकडून वर्षाला ६ हजार रूपये खात्यात जमा होतात. ४ महिन्यांच्या अंतरातून दोन हजार रूपये प्रमाणे तीन टप्प्यात ६ हजार रूपये दिले जातात. परंतु यंदाचा पीएम किसानचा १४ वा हफ्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही.

याआधी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १३ वा हप्ता जमा झाला होता. हा १३ वा हफ्ता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

दरम्यान पीएम किसानचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १५ जुलै ते ३० जुलै या दरम्यान १४ वा हफ्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना १४ व्या हफ्त्यापासून मुकावे लागणार आहे. ज्या याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर त्यालाही 14 वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.

ऑनलाईन ई-केवायसी कसे अपडेट करणार?

१) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.

२) या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

३) E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.

४) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

५) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT