Mahad Rain Agrowon
ताज्या बातम्या

Mahad Rain : पावसाच्या तडाख्यात घर कोसळले

Latest Rain Update Mahad : मुसळधार पावसामुळे महाडमधील सावित्री नदीचे पाणी इशारा रेषेच्या जवळ येऊ लागल्याने महाडकारांना पुराच्या शक्‍यतेने धडकी भरली.

Team Agrowon

Mahad News : मुसळधार पावसामुळे महाडमधील सावित्री नदीचे पाणी इशारा रेषेच्या जवळ येऊ लागल्याने महाडकारांना पुराच्या शक्‍यतेने धडकी भरली. पावसाच्या तडाख्यात तालुक्‍यातील गोठे बुद्रुक येथील एक घर कोसळण्याची घटना घडली आहे. यामध्ये जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात पावसाचा जोर वाढल्‍याने सावित्री, गांधारी व काळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावित्रीची धोक्याची पातळी ६.५० मीटर असून इशारा पातळी सहा मीटर आहे. सावित्री नदीतील पाणी इशारा पातळीजवळ आल्‍याने महाडकरांना पुराची धडकी भरली आहे.

रायगड किल्‍ला, वाळण, विन्हेरे परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. शहरातील सखल भागासह महाड औद्योगिक क्षेत्रातील काही रस्त्यांवर पाणी तुंबल्याने नागरिक व वाहनचालकांची गैरसोय झाली.

तालुक्यातील गोठे गावात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास चंद्रकांत मांजरेकर (५७) यांचे घर कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. घटनास्थळी तलाठी कार्यालयामार्फत पंचनामा करण्यात आला असून अंदाजे सहा ते सात लाखांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे २१ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे व मुख्याधिकारी महादेव रोडगे दरडग्रस्‍त भाग, नदीलगतच्या परिसराची पाहणी करीत आहेत. प्रशासन, एनडीआरएफचे पथक सज्ज असल्‍याचे या वेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT